Share

नागपूर पोलिसांकडून बागेश्वर बाबांना क्लीनचीट; म्हणाले, अंधश्रद्धेसारखं काहीच नाही…

bageshwar baba

गेल्या काही दिवसांपासून छत्तीसगडच्या रायपूरमधील बागेश्वर बाबा चांगलेच चर्चेत आहे. बागेश्वर महाराज यांच्यावर अंधविश्वास पसरवत असल्याचे आरोप होत आहे. त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीकाही होत आहे. तसेच नागपूरमध्ये त्यांच्याविरोधात तक्रार देखील दाखल करण्यात आली होती.

अंधश्रद्धा निर्मूलन समितीने बागेश्वर बाबा यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. पण आता नागपूर पोलिसांनी बागेश्वर बाबांना क्लीनचीट दिली आहे. व्हिडिओमध्ये अंधश्रद्धेसारखे काहीही नाही, असे म्हणत पोलिसांनी धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांना क्लीनचीट दिली आहे.

तसेच याबाबत अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष आणि तक्रारदार श्याम मानव यांना लिखीत स्वरुपाचे उत्तरही पाठवले आहे. नागपूरमध्ये गेल्या आठवड्यात धीरेंद्र शास्त्री यांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर या वादाला सुरुवात झाली होती.

श्रीराम चरित्र चर्चा अशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याविरोधात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने नागपूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. समितीने धीरेंद्र शास्त्रींवर अंधश्रद्धा आणि जादू टोणा प्रकाराला प्रोत्साहन देण्याचा आरोप केला होता.

याप्रकरणी नागपूर पोलिसांनी तपास केला आहे. त्यानंतर पोलिसांनी धीरेंद्र शास्त्री यांना क्लीनचीट दिली आहे. तसेच अंधश्रद्धा निर्मूलन समितीला उत्तरही पाठवले आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर स्पष्ट झालं आहे की, त्यात धर्मप्रचाराशी संबंधित माहिती आहे. त्यामध्ये अंधश्रद्धेसारखं काहीही नाही, असे पोलिसांनी लेखी पत्रात म्हटले आहे.

दरम्यान, कार्यक्रमानंतर समितीने शास्त्रींवर गंभीर आरोप केले होते. दिव्य दरबारच्या माध्यमातून जादू टोण्याला प्रोत्साहन दिले जात आहे. ते सामन्य लोकांना लुबाडत आहे, त्यांची फसवणूक करत आहे, असे समितीचे अध्यक्ष श्याम मानव यांनी म्हटले होते. तसेच आमच्यासमोर चमत्कार दाखवला तर ३० लाख रुपये देऊ असे आव्हानही दिले होते.

महत्वाच्या बातम्या-
…तर आम्ही ‘बांबू’ लावू; ‘पठान’बाबत मनसे आक्रमक; चित्रपटगृहचालकांना दिला ‘हा’ इशारा
‘या’ कारणामुळे आमच्यात कधीच भांडणे का होत नाहीत; जेनेलियाने उघड केले सुखी संसाराचं गुपित
आईच्या दुधाला अन् बापाच्या रक्ताला बेईमान झालेल्या गद्दारांना धडा शिकवल्याशिवाय शांत बसणार नाही’

ताज्या बातम्या राज्य

Join WhatsApp

Join Now