राज्यात १० दिवसांपासून सत्तानाट्य सुरु होते. अखेर एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत हात मिळवणी करत सरकार स्थापन केले आहे. या सरकारमध्ये एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले आहे, तर उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांची निवड करण्यात आली आहे. (nagpur banner photot viral)
देवेंद्र फडणवीसांनी पत्रकार परिषद घेऊन एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होतील असे म्हटले होते. तसेच आपण मंत्रिमंडळात शामील होणार नाही, असे देवेंद्र फडणवीसांनी म्हटले होते. पण त्यानंतरच पक्षाने त्यांना आदेश दिला आणि त्यांना उपमुख्यमंत्रिपद स्वीकारावे लागले आहे.
उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यामुळे देवेंद्र फडणवीस नाराज झाल्याचे अनेकांनी म्हटले आहे. तसेच अनेक राजकीय नेत्यांनी त्यांना टोलेही लगावले आहे. तसेच उपमुख्यमंत्रिपद मिळाल्यामुळे भाजपचे कार्यकर्तेही नाराज असल्याचे दिसत आहे. आता नागपूरमधील एक बॅनर चर्चेचा विषय ठरला आहे.
उपमुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस नागपूरमध्ये आले आहे. त्यांच्या अभिनंदनाचे बॅनर तिथे लावण्यात आले आहे. पण त्या बॅनरवर भाजपचे मोठे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा फोटो वगळ्यात आला आहे. या बॅनरवर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आणि देवेंद्र फडणवीसांचा फोटो लावण्यात आला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर सरकार पाडण्यात फडणवीस यांनी महत्वाची भूमिका बजावली. फडणवीसांनी याआधीही अनेकवेळा महाविकास आघाडी सरकार पाडण्याचा प्रयत्न केला होता. पण आता फडणवीसांचे सरकार स्थापन झाल्यानंतर या सर्व गोष्टीत फडणवीसांना काय मिळालं याचे उत्तर देणारे हे बॅनर आहे.
करिष्य वचन तव.. पक्ष आदेश सर्वपरी… असे बॅनरवर लिहिण्यात आले आहे. पक्षाच्या आदेशाचे पालन करत फडणवीसांनी कार्यकर्त्यांपुढे एक आदर्श ठेवला आहे, असे या बॅनरच्या माध्यमातून कार्यकर्त्यांनी म्हटले आहे. सध्या हा बॅनर सगळीकडे चर्चेचा विषय ठरला आहे.
महत्वाच्या बातम्या-
रिक्षाच्या स्पीडपुढे मर्सिडिजचा स्पीड फिका पडला आहे, कारण…; एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंना टोला
नाणेफेक दरम्यान जसप्रीत बुमराहने समालोचक बुचरची पकडली ‘ही’ चूक, व्हिडिओ झाला व्हायरल
शिंदे ऍक्शन मोडमध्ये, आदित्य ठाकरेंना धक्का देत मुंबई महापालिकेतील खास अधिकाऱ्यांची केली बदली