Share

मविआ अजूनही भक्कम! विरोधकांना चारी मुंड्या चित करण्यासाठी ‘असा’ आखला मास्टरप्लॅन

udhav
भाजपला डावलून राज्यात महाविकास आघाडी सरकार  स्थापन होतं. मुख्यमंत्री पदावरून भाजप – शिवसेनेची युती तुटली. अन् त्यानंतर राज्यात ठाकरे सरकार स्थापन झालं. मात्र अडीच वर्षातच उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हावं लागलं. याला कारण ठरले एकनाथ शिंदे..!
एकनाथ शिंदे यांनी बंड केला अन् ठाकरे सरकार कोसळलं. बघता – बघता सत्तेत शिंदे – फडणवीस सरकार स्थापन झाले. आता महाविकास आघाडीमधील नेते विरोधकांच्या बाकांवर बसले आहेत. शिंदे यांनी हातमिळवणी करत भाजपला आपल्या सोबत सत्तेत घेतले.
यामुळे आता राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. अशातच मंगळवारी मुंबईत महाविकास आघाडीची बैठक पार पडली. महाविकास आघाडी अद्यापही कायम असल्याचं शिवसेनापक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलंअ आहे. उद्धव ठाकरेंच्या या व्यक्तव्याने राजकीय वर्तुळातील अनेकांच्या भुवया उंचवल्या आहेत.
महाविकास आघाडीची बैठक पार पडल्यानंतर उद्धव ठाकरेंनी माध्यमांशी याबद्दल सविस्तर संवाद साधला. पत्रकारांशी बोलताना उद्धव ठाकरेंनी म्हंटलं आहे की, आगामी निवडणुकांच्या रणनीतीबाबत त्या त्या वेळी कळवू असं यावेळी बोलताना उद्धव ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं.
मात्र बैठकीतील चर्चेचा तपशील उद्धव ठाकरेंनी सांगणं टाळलं. तसेच पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, “बऱ्याच दिवसांनी आम्ही तिनही पक्षातील नेतेमंडळी एकत्र भेटलो. यावेळी आमच्यात चांगल्या गप्पा झाल्या. याचबरोबर सत्तेत नसलो तरी महाविकास आघाडी अद्याप फुटलेली नाही, आम्ही एकत्रच आहोत. त्यामुळं पुढच्या निवडणुकांबाबत नंतर बघू”
दरम्यान, पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, ‘आम्ही योग्य पद्धतीने कोरोनाच्या संकट काळाचा सामना केला. कोणाला काही कळत नव्हतं तेव्हा त्याचा मुकाबला सरकारनं केला होता. महाराष्ट्राला दिलासा देणं, आरोग्य सुविधा वाढवणं, चांगल्या सुविधा देणं अशा सुविधा आम्ही दिल्या. त्या संकटापुढं हे आजचं संकट काहीच नसल्याच त्यांनी नमूद केलं.
महत्वाच्या बातम्या-
Deepak Kesarkar : ‘५० खोके काय ५० रुपये जरी घेतले असतील तर राजीनामा देईल’, केसरकरांचे विरोधकांना प्रत्यु्त्तर
Udhhav Thackeray : लवकरच स्वत: महाराष्ट्र पिंजून काढणार अन्.., विरोधकांना इशारा देत उद्धव ठाकरेंची मोठी घोषणा
Optical illusions: ‘या’ फोटोमध्ये दडला आहे एक चेहरा, फक्त ३०% लोकांना ३० सेकंदात देता आलंय योग्य उत्तर
इतर ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now