Share

शिवपुराण कथेसाठी मुस्लिम बांधवाने शेतीवर फिरवला नांगर, वापरासाठी दिली ६० एकर जमीन

याला म्हणतात एकता! परभणीत हिंदूंच्या कार्यक्रमासाठी मुस्लिम बांधवाने दिली ६० एकर जमीन

शिवपुराण कथेसाठी मुस्लिम बांधवाने शेतीवर फिरवला नांगर, वापरासाठी दिली ६० एकर जमीन

सर्वधर्म समभाव असे सगळेच म्हणतात पण अजूनही बऱ्याच ठिकाणी धर्माधर्मांमध्ये वाद झालेले आपण पाहिले आहेत. पण याउलट काही ठिकाणी लोकांमध्ये एवढा एकोपा पाहायला मिळतो की त्यांचे कौतुक करावे तेवढे कमी आहे. असेच काहीसे उदाहरण परभणीमध्ये पाहायला मिळाले आहे.

परभणीत हिंदू-मुस्लिम एकतेचे दर्शन घडले आहे. मुस्लिमांचा इजतेमा हिंदूंच्या जागेवर अन् हिंदूचे शिवपुराण मुस्लिमांच्या जागेवर होत आहे. एवढंच काय तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की, एका मुस्लिमाने शिवपुराणासाठी चक्क १५ एकर तूर आणि साडेतीन एकर हरभऱ्यावर ट्रॅक्टर फिरवला.

परभणीमध्ये एक म्हण प्रचलित आहे ती म्हणजे, जगात जर्मनी आणि भारतात परभणी. येथील माणसं त्यांच्या स्वभावामुळे सगळीकडं फेमस आहेत. येथील माणसं कुणालाही आपलंस करतात. सर्व समाज बांधव येथे सर्वधर्म समभावाने वागतात. ८ डिसेंबरला येथे मुस्लिम बांधवांचा इजतेमा पार पडला.

तीन दिवस लाखो मुस्लिम बांधव येथे आले होते. त्यांनी येथे धर्माची शिकवण घेतली. त्यांच्यासाठी हिंदू बांधवही मदतीला आले होते त्यामुळे त्यांचं कौतुक होत आहे. इजतेमासाठी हिंदूंची जमीन त्यांना वापरण्यासाठी देण्यात आली होती. मुस्लिम बांधवांना लागणाऱ्या इतर सोयीसुविधांची व्यवस्था हिंदू बांधवांनी केली होती.

त्यानंतर आता येत्या १३ ते १७ जानेवारीला परभणीत पंडित प्रदीप महाराज मिश्रा यांचे शिवपुराणाचे व्याख्यान पार पडणार आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी याचे आयोजन केले आहे. एवढा मोठा कार्यक्रम होणार म्हणजे याला हजारो लोकं येणार. पण हा कार्यक्रम नेमका घ्यायचा कोठे? असा प्रश्न पडला होता.

परभणीतील प्लॉटिंग व्यवसायिक हाजी शोएब यांनी हा प्रश्न मिटवला. त्यांनी पुढाकार घेऊन आपली ६० एकर जमीन या शिवपुराण कथेसाठी दिली. त्यांनी यासाठी एक रुपयाही घेतला नाही. एवढेच नाही तर त्यांनी १५ एकरवर असलेल्या त्यांच्या पिकांवर नांगर फिरवला. यामध्ये त्यांचे लाखोंचे नुकसान झाले पण त्यांनी याचा जराही विचार केला नाही. आता येथे शिवपुराण कथेची जय्यत तयारी सुरू आहे.

महत्वाच्या बातम्या
उर्फी जावेदने घेतली जावेद अख्तरांची भेट; म्हणाली,”अखेर मी माझ्या आजोबांना भेटले
Spielplatz : ‘या’ गावात कपडे घालण्यावर आहे बंदी, नग्नाअवस्थेत राहतात लोक, वाचून बसणार नाही विश्वास
Hardik pandya : सूर्याच्या फटकेबाजीवर जळतोय हार्दीक पांड्या; म्हणतो त्याची फलंदाजी पाहून मी निराश, कारण..
कमाईच्या बाबतीत सैराटला मागे टाकणार ‘वेड’; ९ दिवसातच तोडला सैराटचा रेकॉर्ड, कमावले ‘इतके’ कोटी

ताज्या बातम्या इतर

Join WhatsApp

Join Now