महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्यानिमित्त मुंबईत एक भाषण दिले होते. त्यावेळी त्यांनी वेगवेगळ्या गोष्टींवर भाष्य केले होते. त्यांनी सत्ताधारी पक्षावर जोरदार टीका केली होती. तसेच मशिदींवरील भोंग्यांबाबतही भाष्य केले होते. (muslim manase leader support raj thackeray)
राज ठाकरे यांच्या या भाषणामुळे राज्यभरात वेगवेगळ्या प्रतिक्रिया पाहायला मिळत आहे. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रसने राज ठाकरेंच्या या वक्तव्यावरुन त्यांच्यावर टीका केली आहे. अशात मनसेमध्येही काही पदाधिकाऱ्यांनी राज ठाकरेंच्या भूमिकेवर नाराजी दाखवली आहे, तर काही पदाधिकाऱ्यांनी त्यांचे समर्थन केले आहे.
मनसेचे प्रदेश सचिव इरफान शेख यांनी सोशल मीडियावर भावूक पोस्ट लिहीली. तर पुण्याचे मनसे नगरसेवक वसंत मोरे यांनी राज ठाकरेंचे आदेश झुगारत मी माझ्या प्रभागात लाऊडस्पीकर लावणार नाही, असे म्हटले होते. पण आता मनसेतील काही मुस्लिम पदाधिकारी राज ठाकरेंच्या भूमिकेला समर्थन देण्यासाठी सरसावले आहे.
नाशिकनंतर आता सोलापूर शहर मनसे अध्यक्ष जैनोद्दीन शेख यांनी राज ठाकरेंच्या भूमिकेला समर्थन दिले आहे. राज ठाकरे यांनी मुस्लिम समाजाच्या नमाजाला, अजानला विरोध केला नाही. राज्यात शांतता राखावी याचा विचार पहिले राज ठाकरे करतात, असे जैनोद्दीन शेख यांनी म्हटले आहे.
तसेच एपीजे अब्दुल कलाम यांच्यासारख्या देशासाठी चांगले काम करणाऱ्या प्रत्येकांचं राज ठाकरे आदर करतात. इरफान पठाण, सानिया मिर्झासारख्या खेळाडूंचेही कौतूक राज ठाकरेंनी केले आहे. मशिदीवरील भोंग्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे जे आदेश आहे, तीच भूमिका राज ठाकरे यांनी मांडली आहे. जे पदाधिकार राजीनामे देत आहे, त्यांना राज ठाकरेंची भूमिका समजलेलीच नाही, असेही जैनोद्दीन शेख यांनी म्हटले आहे. यावेळी त्यांनी वंसत मोरे यांनाही अप्रत्यक्षपणे टोला लगावला आहे.
याआधी नाशिकमध्ये मनसेचे माजी नगरसेवक सलीम शेख यांनी राज ठाकरेंच्या भूमिकेला पाठिंबा दिला. सर्वोच्च न्यायालयाने ध्वनिक्षेपाबाबत आधीच आदेश दिले आहे. तसेच ज्याप्रमाणे श्रीराम मंदिराचा निकाल मान्य केला, तसाच याचा निकालही मान्य करायला हवा, असे सलीम शेख यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या-
पद गेलं तरी चालेल पण.., मनसेने हकालपट्टी केली तरी वसंत मोरे आपल्या भूमिकेवर ठाम
रेखासोबत केला टाईमपास, हेमासोबत मंदिरात लग्न करायला गेले पण.., जितेंद्र यांची लव्ह लाईफ वाचून अवाक व्हाल
सनसनीत कचकटून थोबाडीत देऊन.., किरण मानेंनी पुन्हा ‘मुलगी झाली हो’ च्या निर्मात्यांना डिवचलं