Share

हिंदुत्ववादी संघटनेकडून गरीब मुस्लिम व्यक्तीच्या पोटावर पाय; कलिंगडांचा पाडला खच, संतापजनक VIDEO व्हायरल

कर्नाटकच्या धारवाडमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. धारवाडमध्ये एका गरीब मुस्लिम फळ विक्रेत्याचे सर्व कलिंगड श्रीराम सेनेच्या कार्यकर्त्यांनी रस्तावर आपटून फोडले आहे. त्या फोडलेल्या कलिंगडाचा खच रस्त्यावर पडलेला दिसून येत आहे. याचे व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (muslim fruit seller viral video)

दे दृश्य खुपच भयानक आहे. यासंबंधिची पोस्ट मोहम्मद झुबेर नावाच्या व्यक्तीने केली आहे. तसेच या घडलेल्या प्रकाराबाबत त्याने सविस्तर माहिती दिली आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांच्या या कृत्यामुळे अनेकांनी संताप व्यक्त केला आहे.

ज्या व्यवसायिकाच्या हातगाडीवरील कलिंगडांचे नुकसान केले गेले आहे, तो एक मुस्लिम आहे. श्रीराम सेनेचे कार्यकर्ते गळ्यात बजरंग दलाची पट्टी लावून ते कलिंगड रस्त्यावर फोडत असल्याचे दिसून येत आहे. यावेळी त्याच्या गाडीवरचे सर्वच कलिंगड त्यांनी खाली फोडल्याचे दिसून येते.

संबंधित घटना ही धारवाडीतील हनूमान मंदिराबाहेरील आहे. यावेळी पोलिसही तिथे उपस्थित होते, पण ते सर्वजण बघ्याची भूमिका घेत असल्याचे दिसून येत आहे. मोहम्मद झुबेर याने हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्यामध्ये त्याने कॅप्शनमध्ये तिथे घडलेल्या घटनेचे वर्ण केले आहे.

श्रीराम सेनेच्या गुंडांकडून गरीब मुस्लिम फळविक्रेतेच्या हातगाडीची तोडफोड होत आहे. तिथे पोलिसही उपस्थित आहे. पण त्या ठिकाणी असणाऱ्या पोलिसांनी कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप केलेला नाही, असे मोहम्मद झुबेरने कॅप्शनमध्ये लिहिले आहे. यावेळी त्याने कर्नाटकचे मुख्यमंत्री बी एस बोम्मई यांना टॅग केले आहे. तसेच उपस्थित असलेल्या पोलिसांनी कारवाई का केली नाही? असा प्रश्न त्याने उपस्थित केला आहे.

धारवाडमध्ये घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली आहे. तसेच अनेकांनी या घटनेनंतर नाराजी व्यक्त केली आहे. यावेळी घाबरून गेलेला व्यवसायिक त्यांनी कलिंगड फोडून टाकल्यानंतर शांततेत आपली गाडी तिथून घेऊन जाताना दिसत आहे.

महत्वाच्या बातम्या-
RCB चा जबरदस्त गोलंदाज हर्षल पटेल IPL सोडून परतला घरी, धक्कादायक कारण आले समोर
शाळेत उशिरा येण्याबाबत विचारलेला प्रश्न झोंबला, शिक्षिकेनं थेट ऑन कॅमेरा पत्रकाराला केली मारहाण, VIDEO झाला व्हायरल
गोपीचंद पडळकर यांच्या भावाच्या गाडीचा अपघात, गंभीर जखमी अवस्थेत रुग्णालयात केले दाखल

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now