काही दिवसांपूर्वी शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानचे संस्थापक संभाजी भिडे यांचा अपघात झाला होता. सायकलवरुन जात असताना ते पडले होते. त्यामुळे त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आताही त्यांच्यावर उपचार सुरु आहे. (muslim doctor treatment on bhide guruji)
अशात एक गोष्ट चर्चेचा विषय ठरली आहे. प्रखर हिंदुत्वाची भूमिका घेणारे भिडे यांच्यावर एका मुस्लीम डॉक्टराने उपचार केले आहे. विशेष म्हणजे भिडेंवर उपचार करणे आपले कर्तव्य आहे. त्यामुळे त्यांनी आपला पुरस्कार सोहळा रद्द करुन त्यांच्यावर उपचार केले आहे.
कोणत्याही गोष्टीचा विचार न करता आपले कर्तव्य बजावल्यामुळे सोशल मीडियावर त्यांचे कौतूक होत आहे, इतकंच नाही तर राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनीही संभाजी भिडेंनी मुस्लीम डॉक्टरांकडून उपचार घेतले असल्याचे म्हटले आहे.
काही दिवसांपूर्वी सांगलीमध्ये संभाजी भिंडे सायकलवरुन फिरत असताना चक्कर येऊन पडले होते. या अपाघातात संभाजी भिडे यांच्या खुब्याला मुक्कामार लागला होता. त्यामुळे त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना मिरजेच्या भारती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.
अपघातामुळे संभाजी भिडे यांच्या हृदयाची तपासणी करणे गरजेचे होते. तर हॉस्पिटलमध्ये हृदयरोग तज्ञ म्हणून मिरजचे प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ रियाज मुजावर कार्यरत आहे. त्यामुळे याची जबाबदारी त्यांच्यावर आली आणि त्यांनी संभाजी भिडे यांच्या हृदयाची लगेच तपासणी केली.
विशेष म्हणजे ज्यादिवशी रियाज यांनी भिडे गुरुजींवर उपचार केले, त्याच दिवशी रियाज यांचा पुरस्कार सोहळा होता. त्यांच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याने त्यांना नेल्सन मंडेला नोबल पीस अवॉर्ड हा पुरस्कार जाहीर करण्यात आला होता. मुंबईत हा पुरस्कार सोहळा होता, पण त्यांनी सोहळ्याला जाणे रद्द केले आणि भिडे गुरुजींवर उपचार केले.
महत्वाच्या बातम्या-
मनसुख हिरेन हत्या प्रकरणात मोठा ट्विस्ट; NIA ने सांगितले मुख्य सुत्रधाराचे नाव
अक्षया देवधरच्या साखरपुड्याच्या पोस्टवर तिच्या एक्स बॉयफ्रेंडने केली कमेंट, म्हणाला…
वयाच्या 20 व्या वर्षी ‘ही’ अभिनेत्री स्वतःहून बनली मोठ्या स्टार्सची आई, 250 हुन अधिक चित्रपटात केले काम