murji patel statement after andheri election cancel | गेल्या काही दिवसांपासून अंधेरी पुर्व पोटनिवडणूकीची जोरदार चर्चा होती. पण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ही निवडणूक बिनविरोध व्हावी अशी इच्छा भाजपचे देवेंद्र फडणवीस यांच्याकडे व्यक्त केली होती. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही निवडणूक बिनविरोध व्हावी असे आवाहन केले होते.
त्यानंतर भाजपने ही निवडणूक बिनविरोध होणार असल्याचे जाहीर केले आहे. आता उद्धव ठाकरे यांच्या गटाच्या शिवसेना उमेदवार ऋतुजा लटके यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यानंतर भाजपचे उमेदवार मुरजी पटेल यांनी यावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
पक्षाचा आदेश माझ्यासाठी सर्वस्व असल्याचे मुरजी पटेल यांनी म्हटले आहे. तसेच यावेळी त्यांनी ऋतुजा लटके यांना शुभेच्छाही दिल्या आहे. अंधेरी पुर्वचे आमदार रमेश लटके यांचे निधन झाले आहे. त्यामुळे ही पोटनिवडणूक लढवण्यात येणार होती. पण त्यांनी सर्वांनी माघार घेतल्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होणार आहे.
पक्षाने जो आदेश दिला आहे, तो मी पाळणार आहे. माझ्यावर अजिबात कोणाचा दबाव नाही. आमच्यासाठी भाजप आमची आई आहे. मरेपर्यंत मी पक्षासाठी काम करत राहणार आहे. पक्षाचा आदेशच माझ्यासाठी सर्वकाही आहे, असे मुरजी पटेल यांनी म्हटले आहे.
केंद्रीय आणि राज्यातील नेतृत्वाखाली मला आयुष्यभर काम करायचे आहे. पद असो नसो काहीही फरक पडत नाही. अंधेरीच्या जनतेची सेवा आम्ही आयुष्यभर करत राहू. अंधेरीच्या जनतेने मला साथ दिली. ते मला अशीच साथ पुढेही देत राहतील, असेही मुरजी पटेल यांनी म्हटले आहे.
तसेच मी अपक्ष लढणार नाही. मी पक्षाला माणणारा कार्यकर्ता आहे. मी ऋतुजा लटके यांना शुभेच्छ देतो, असेही मुरजी पटेल यांनी म्हटले आहे. मुरजी पटेल यांनी या निवडणूकीसाठी अर्ज देखील भरला होता. पण त्यानंतर केंद्रीय आणि राज्याच्या नेतृत्वाने हा अर्ज माघारी घेण्याचा निर्णय घेतला आहे.
महत्वाच्या बातम्या-
VIDEO: पुन्हा मिडीयावर भडकल्या जया बच्चन, नेटकरी म्हणाले, ‘तुम्ही घराबाहेरच कशाला निघता?’
Rahul Bhatia: ३८ हजार कोटींचा मालक चहात बुडवून खात होता पार्ले-जी, फोटोने जिंकली लोकांची मनं
Business: सफाई कामगाराची मुलगी झाली करोडपती, नोकरी सोडून केला ‘हा’ व्यवसाय, उभे केले भलेमोठे साम्राज्य