Share

Mumbai : पतीच्या मृत्यूची माहिती मिळताच पत्नीनेही सोडले प्राण, मुंबईतील हृदयद्रावक घटना

vikroli

Mumbais man wife death after mans death  | मुंबईच्या विक्रोळीमधून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. या परिसरात एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. पण त्याच्या मृत्यूची बातमी मिळताच त्याच्या पत्नीने सुद्धा आपले प्राण सोडले आहे. संबंधित घटना ही विक्रोळीच्या कन्नमवार परिसरातील आहे.

या घटनेसोबत कुटुंबासह परिसरातील लोकांनाही धक्का बसला आहे. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांनीही हळहळ व्यक्ती केली आहे. मृत झालेल्या पतीचे नाव विनू कोशी आहे. तर त्याच्या मृत्यूची बातमी ऐकून जीव गमावलेल्या पत्नीचे नाव प्रमिला कोशी असे आहे.

विनू कोशी आणि प्रमिला हे दोघेही कन्नमवार परिसरात राहत होते. सोमवारी सकाळी विनू कोशी यांची प्रकृती खुपच बिघडली होती. त्यामुळे त्यांना विक्रोळीच्या टागोरनगरमधील क्रांतिवीर महात्मा ज्योतिबा फुले रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण तिथे डॉक्टरांनी त्यांना तपासले असता मृत घोषित केले.

त्यानंतर विनू कोशी यांच्या मृत्यूची माहिती प्रमिला यांना देण्यात आली. त्यामुळे त्यांना मोठा धक्का बसला. पती या जगात नाही हे ऐकल्यावर त्यांचीही प्रकृती बिघडली. त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यामुळे त्यांनी देखील तिथेच आपले प्राण सोडले. आधी विनू आणि नंतर प्रमिलाचा मृत्यू झाल्यामुळे कुटुंबात शोककळा पसरली आहे.

एकीकडे पत्नीचं पतीवर असलेल्या प्रेमामुळे जीव गेला आहे. तर दुसरीकडे परभणीतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका पतीने आपल्या पत्नीवर हल्ला केला आहे. त्यांच्या घटस्फोटाची सुनावणी सुरु होती. त्यावेळी पत्नीने तडजोड न केल्यामुळे पतीने पत्नीवर हल्ला केला आहे.

त्यानंतर पोलिसांनी त्या आरोपीला ताब्यात घेतले आहे. पतीने केलेल्या हल्ल्यात पत्नी गंभीर जखमी झाली होती. त्यामुळे तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिच्यावर जिल्हा परभणी रुग्णालयात उपचार सुरु आहे. न्यायालयाच्या आवारात ही घटना घडल्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे.

महत्वाच्या बातम्या-
हातात तिरंगा अन् डोळ्यात अश्रू.. मैदानात आलेल्या चाहत्यासोबत रोहीतने केली सर्वांची मनं जिंकणारी गोष्ट
इंग्लंडविरुद्ध एकही चेंडू न खेळता टिम इंडीया जाऊ शकते वर्ल्डकपच्या फायनलला; ‘हा’ आहे नवा नियम..
Sania Mirza : सानिया मिर्झा-शोएब मलिकच्या नात्यात आलाय दुरावा? सानिया म्हणाली, मी सर्वात वाईट…

ताज्या बातम्या राज्य

Join WhatsApp

Join Now