Share

मोठा धक्का! मुंबईने ९७ धावांवरच चेन्नईला ऑलआऊट करत जिंकला सामना, चेन्नईचं प्लेऑफचं स्वप्न भंगलं

इंडियन प्रीमियर लीग २०२२ च्या ५९ व्या सामन्यात मुंबई इंडियन्सने चेन्नई सुपर किंग्जचा ५ गडी राखून पराभव केला. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळवण्यात आलेला सामना मुंबई इंडियन्सने ३१ चेंडू राखून जिंकला. या विजयासह चेन्नई सुपर किंग्जचे आयपीएल २०२२ च्या प्लेऑफमध्ये पोहोचण्याचे स्वप्नही भंगले. (mumbai won match by 5 wickets)

मुंबई इंडियन्सच्या डॅनियल सॅम्सला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. मुंबईच्या या विजयानंतर मुंबईच्या खात्यात दोन गुण जमा झाले, पण पॉईंट्स टेबलमध्ये त्यांच्या आणि चेन्नईच्या स्थानात कोणताही बदल झालेला नाही. कारण दोन्ही संघ आधीपासून पॉईंट्स टेबलमध्ये खालच्या स्थानी आहे.

या सामन्यात मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. यावेळी फलंदाजी करताना चेन्नईला १६ षटकांत फक्त ९७ धावा करता आल्या. त्यांची आयपीएलमधील ही दुसरी सर्वात कमी धावसंख्या आहे. लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सने १४.५ षटकात ५ गडी गमावत १०३ धावा केल्या आणि सामना जिंकला.

मुंबईकडून टिळक वर्माने सर्वाधिक नाबाद ३४ धावा केल्या. हृतिक शोकीन १८ धावा करून बाद झाला. टीम डेव्हिड ७ चेंडूत १८ धावा करून नाबाद राहिला. रोहित शर्मानेही १८ धावा केल्या. चेन्नई सुपर किंग्जकडून मुकेश चौधरीने २३ धावा देत ३ बळी घेतले.

चेन्नईचे ७ फलंदाज दुहेरी आकडा गाठू शकले नाहीत. एमएस धोनी ३३ चेंडूत ३६ धावा करून नाबाद राहिला. त्याच्याशिवाय अंबाती रायुडू, शिवम दुबे आणि ड्वेन ब्राव्हो यांनाच दुहेरी आकडा गाठता आला. मुंबई इंडियन्सकडून डॅनियल सॅम्सने १६ धावा देत ३ बळी घेतले. रिले मेरेडिथ आणि कुमार कार्तिकेय यांनीही २-२ विकेट्स घेण्यात यश मिळवले. जसप्रीत बुमराह आणि रमणदीप सिंगनेही प्रत्येकी एक विकेट घेतली.

मुंबई इंडियन्सने त्यांच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये दोन बदल केले होते. ते म्हणजे कायरन पोलार्डच्या जागी ट्रिस्टन स्टब्स आणि मुरुगन अश्विनच्या जागी हृतिक शोकीन. चेन्नई सुपर किंग्जने कोणताही बदल न करता या सामन्यात प्रवेश केला. या सिजनमध्ये दोन्ही संघ दुसऱ्यांदा आमनेसामने आले आहेत. आधीच्या सामन्यात चेन्नईने विजय मिळवला होता.

महत्वाच्या बातम्या-
ऑप्टिकल इल्युजनने अनेकांची केली बत्तीगुल, आता तुम्हीच सांगा या फोटोत नक्की किती घोडे?
मॅच आहे कि विनोद! मैदानावर लाईट नसल्यामुळे फलंदाजाला घेता आला नाही डीआरएस; वानखेडेवर गोंधळ
नितेश राणेंनी रोहित पवारांना पुन्हा डिवचले; ट्विटमधून असा काही हल्ला केला की….

खेळ ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now