सलमान खानला धमक्या आल्यानंतर मुंबई पोलिस ऍक्शन मोडमध्ये, उचलले ‘हे’ मोठे पाऊल
गरज पडल्यास आम्ही सलमान खानची…, धमकी प्रकरणात मुंबईच्या पोलिस आयुक्तांचे मोठे वक्तव्य
अभिनेता सलमान खानला मिळालेल्या धमकीच्या पत्रावर मुंबईचे सीपी संजय पांडे म्हणाले की, मुंबई पोलीस हे प्रकरण गांभीर्याने घेत आहेत. त्यांना मिळालेल्या पत्राची आणि या संपूर्ण प्रकरणाची आम्ही चौकशी करत असून, याप्रकरणी अद्याप कोणालाही ताब्यात घेण्यात आलेले नाही. गरज पडल्यास आम्ही सलमान खानची सुरक्षा वाढवू, असंही मुंबईचे कमिश्नर संजय पांडे म्हणाले.
या प्रकरणात सलमान खानचाही जबाब नोंदवण्यात आला आहे. पण अद्याप जबाबात सलमान खान काय म्हणाला? याबाबत कोणताही खुलासा करण्यात आला नाही. रविवारी बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि त्याचे वडील सलीम खान यांना धमकीचे पत्र आले होते.
त्यानंतर ही माहिती मुंबई पोलिसांना देण्यात आली. त्याचवेळी वांद्रे पोलिसांनी याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिस या प्रकरणाता कसून तपास करत आहेत. त्याचवेळी, पोलीस बँडस्टँड परिसरात लावण्यात आलेले सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत आणि चिट सोडलेल्या स्थानिक लोकांची चौकशी करत आहेत.
एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, हे पत्र सलीम खानच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांना सलीम खान मॉर्निंग वॉक केल्यावर ज्या ठिकाणी बसतात त्या ठिकाणी मिळाले होते. एका पोलीस अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, सलीम खान सकाळची दिनचर्या पाळतात आणि रोज आपल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांसोबत फिरायला जातात.
अशी एक जागा आहे जिथे ते सहसा ब्रेक घेतात. त्याचवेळी एका बाकावर त्यांच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांना एक चिट्ठी मिळाली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या पत्रात सलमान आणि सलीम खान या दोघांनाही गंभीर धमक्या देण्यात आल्या होत्या. त्या पत्रात “मूसेवाला जैसा कर दूंगा” असे लिहिले होते.
त्यानंतर वांद्रे पोलिसांना ही माहिती देण्यात आली. वांद्रे पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्याचवेळी, पोलीस बँडस्टँड परिसरात लावण्यात आलेले सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत आणि चिट सोडलेल्या व्यक्तीबाबत स्थानिक लोकांशी चौकशी करत आहेत.
महत्वाच्या बातम्या
या’ स्पर्धकाला मंचावर पाहताच ढसाढसा रडू लागली नेहा कक्कर; कारण ऐकून तुमच्याही डोळ्यात पाणी येईल
सेक्रेड गेम्स’फेम अभिनेत्रीचा गौप्यस्फोट; माझ्या काकांनी मला पॅंट काढायला लावली अन्…
बॉलीवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा; म्हणाली, ‘काकांनी माझ्या मांडीला…’
सांगलीतील ३ मित्रांचा भीषण अपघातात मृत्यु, एकाच मोटारसायकलवर चालले होते चौघे