Share

ठाकरे सरकारचा जोरदार पलटवार, भाजपच्या ‘या’ बड्या नेत्यावर गुन्हा दाखल

अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना ईडीने अटक केल्यानंतर राजकीय वर्तुळात चांगलेच वातावरण तापले आहे. एकीकडे नवाब मलिक यांच्यामुळे महाविकास आघाडीमध्ये तणावपुर्ण स्थिती निर्माण झाली असताना दुसरीकडे एका भाजप नेत्याने स्व:ताच्याच हाताने आपल्या पायावर दगड मारुन घेतला आहे. नवाब मलिकांच्या अटकेनंतर भाजप नेते मोहीत कंबोज यांनी जल्लोष व्यक्त करताना तलवार दाखवल्यामुळे मुंबई पोलिसांनी त्याच्यावर कारवाई केली आहे.

बुधवारी नवाब मलिक यांच्या अटकेची बातमी येताच भाजप नेत्यांनी राज्यभर जल्लोष साजरी करण्यास सुरुवात केली. या जल्लोषात मोहीत कंबोज हे देखील सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी आघाडी विरोधात घोषणाबाजी केली. तसेच आपला जल्लोष व्यक्त करत त्यांनी आनंदाच्या भरात तलवार बाहेर काढून नाचवली. परंतु याची माहिती मुंबई पोलिसांना लागताच ते घटनास्थळी दाखल झाले.

या घटनेचा व्हिडीओ सोशल मिडीयावर देखील व्हायरल झाला आहे. मुख्य म्हणजे मोहीत कंबोज यांच्या आनंदाने त्यांच्याच अडचणीत वाढ केली आहे. त्यामुळे आता याप्रकरणी मुंबई पोलिस मोहीत कंबोज यांच्यावर काय कारवाई करतील याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे. यापुर्वी देखील आपल्या काही विधानांमुळे कंबोज अडचणीत आले होते.

मध्यंतरी महाविकास आघाडीने कंबोज यांच्यावर गैरव्यवहार केल्याचे आरोप लावले होते. दरम्यान नवाब मलिक यांच्या अटकेनंतर आघाडी नेते भाजप विरोधात चांगलेच पेटून उठले आहेत. यातच आघाडी आता मलिक यांचा राजीनामा मागेल अशा बातम्या समोर आल्या आहेत. परंतु अद्याप या संबंधीत आघाडीच्या नेत्यांनी कोणतीही माहिती दिलेली नाही.

काल मनी लाँड्रिंग प्रकरणात आठ तासांच्या चौकशीनंतर अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना ईडीने अटक केली आहे. नवाब मलिक यांचे अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी मनी लाँड्रिंग प्रकरणात संबंध असल्याचे सांगत ईडीने ही कारवाई केली आहे. त्याच्या अटकेनंतर आता पुढील नंबर अनिल परब यांचा लागणार असल्याचे वक्तव्य भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केले आहे.

पत्रकारांशी संवाद साधताना, अनिल देशमुख यांच्यानंतर नवाब मलिक आणि आता तिसरा नंबर अनिल परब यांचा नंबर लागणार आहे. ठाकरे सरकारने कितीही दादागिरी आणि माफियागिरी केली तरी उद्धव ठाकरेंच्या घोटाळेबाजांना आम्ही सोडणार नाही. महाराष्ट्राला घोटाळेमुक्त करणार असल्याचे सोमय्या यावेळी म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यांने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले.

महत्वाच्या बातम्या
भन्नाट ऑफर! पावनखिंड पाहणाऱ्यांना मिळणार मिसळवर डिस्काऊंट, अभिनेत्याने दिली माहिती, म्हणाला..
वारं पठ्ठ्या! मार्कशीटमधील एका गुणासाठी बोर्डाला खेचलं हायकोर्टात, तीन वर्षांनी आला ‘हा’ निकाल
‘बिग बॉस’ फेम मराठमोळ्या विकास पाटीलने गावाकडील शेतात बांधले टुमदार घर, पहा सुंदर फोटो

राजकारण

Join WhatsApp

Join Now