गेल्या काही महिन्यांपासून राज्यात बलात्काराच्या अनेक घटना समोर येत आहे. असे असतानाच आता मुंबईतून एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. मुंबई पोलिसांनी २४ वर्षीय मॉडेलवर बलात्कार केल्याप्रकरणी एका चित्रपट निर्मिती समन्वयक आणि तीन बटल्यांना अटक करण्यात आली आहे. हा घटना एक वर्षापूर्वीची आहे. (mumbai model rape)
याप्रकरणी पीडित मॉडेलने अभिनेत्री गेहाना वशिष्ठ विरोधात एफआयआर दाखल केला होता. याप्रकरणी तीन बटल्यांना अटक करण्यात आली आहे. विशेष तपास पथक (एसआयटी) या प्रकरणाचा तपास करत होते. हे पथक जवळपास वर्षभरापासून चार प्रकरणांच्या तपासात गुंतले आहे.
त्या चार प्रकरणांमध्ये चित्रपट अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा देखील सामील आहे. या प्रकरणी पोलिसांनी चित्रपट समन्वयक नरेश पाल, सलीम सय्यद, अब्दुल सय्यद आणि अमन बर्नालवाल यांना अटक केली आहे. राज कुंद्राने अनेक दिवस जेलमध्ये घालवल्यानंतर सध्या जामिनावर बाहेर आहे.
गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात हे अश्लील चित्रपट रॅकेट समोर आले होते. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने मड बेटावरील एका बंगल्यावर छापा टाकला. छाप्यादरम्यान गुन्हे शाखा घटनास्थळी पोहोचली असता, तेथे एका अश्लील चित्रपटाचे चित्रीकरण सुरू होते. नंतर हे चित्रपट सोशल मीडियावर पोस्ट करण्यात येणार होते.
पोलीस अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, या प्रकरणी तक्रारदार मॉडेलने ११ जानेवारी २०२१ रोजी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. पीडितेने तिच्या तक्रारीत लिहिले आहे की, अभिनेत्री गेहाना वशिष्ठने तिला वेब सीरिजमध्ये रोल ऑफर केला होता.
दरम्यान, ही वेब सिरीज एका शाही जोडप्याची आणि तीन बटल्यांची कथा होती. मात्र, पीडितेच्या म्हणण्यानुसार, जेव्हा ती बंगल्यात पोहोचली तेव्हा तिला तीन बटल्यांसोबत सेक्स करण्यास सांगितले. त्यानंतर तिने विरोध केला असता तिच्यावर बळजबरीने तीन बटल्यांनी सेक्स केला.
महत्वाच्या बातम्या-
विवाहित महिलेचे जडले १७ वर्षाच्या मुलावर प्रेम, शारीरीक संबंध बनवले अन्…; महाराष्ट्र हादरला
माझ्या जीवाला धोका, हत्येचा कट रचला जातोय; प्रसिद्ध मराठी गायिकेच्या वक्तव्याने खळबळ
अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या जावयाची सासूने केली हत्या, पुण्यातील धक्कादायक घटना