मुंबई इंडियन्सला अखेर आयपीएलच्या यंदाच्या सिजनमधील पहिला विजय मिळाला आहे. कर्णधार रोहित शर्माच्या वाढदिवसाच्या दिवशी मुंबई इंडियन्सने राजस्थान रॉयल्सचा ५ विकेट्सने पराभव करत विजय मिळवला. या सिजनमधील सलग ८ पराभवानंतर मुंबई इंडियन्सचा हा पहिलाच विजय आहे, (mumbai indians win fist match)
मुंबई इंडियन्सला शेवटच्या षटकात विजयासाठी चार धावांची गरज होती, पण कायरन पोलार्ड पहिल्याच चेंडूवर बाद झाला. मात्र, पुढच्याच चेंडूवर डॅनियल सॅम्सने षटकार ठोकून सामना संपवला आणि मुंबईला पहिला विजय मिळवून दिला. मुंबईच्या या विजयमामुळे चाहतेही खुश झाले आहे.
या सामन्यात राजस्थान रॉयल्सने प्रथम फलंदाजी करताना १५८ धावा केल्या होत्या, प्रत्युत्तरात मुंबई इंडियन्सने अखेर हे लक्ष्य गाठले. मुंबईकडून सूर्यकुमार यादवने ५१ धावांची शानदार खेळी खेळली. मात्र, बर्थडे बॉय रोहित शर्मा केवळ २ धावा करून बाद झाला.
सलग आठ सामन्यांत पराभवाचा सामना केल्यानंतर मुंबई इंडियन्सने अखेर दणदणीत विजयाची नोंद केली. विजयानंतर रोहित शर्मा खुप खुश झाला होता. इतकंच नाही, तर त्याने आपल्या संघातील खेळाडूंचे कौतूकही केले आहे. त्याने हृतिक शोकीन आणि कुमार कार्तिकेय सिंगचे कौतूक केले आहे.
रोहित शर्मा म्हणाला की, आमच्या खेळाडूंनी शानदार खेळ दाखवला. आम्ही असेच खेळतो. आज खरी क्षमता समोर आली आहे, विशेष म्हणजे गोलंदाजीत. आपण विकेट घेत राहिल्यास त्यांना धावा करणे कठीण होईल, असे आम्ही ठरवले होते. त्यामुळेच त्यांना जास्त धावा करता आल्या नाही.
रोहित शर्मा म्हणाला की, आम्ही खूप चांगले खेळलो, गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली, फलंदाजही कामाला आले. हृतिक शोकीन आणि कुमार कार्तिकेय सिंगनेही सामन्यात चांगली कामगिरी केली. दोघांनाही नेहमीच चांगलं काम करायचं असतं आणि दोघांनाही काहीतरी वेगळं करायचं असतं, जेणेकरून माझा त्यांच्यावर विश्वास बसेल.
महत्वाच्या बातम्या-
आता तर हद्दच झाली! पुनम पांडेने पुन्हा दिले टॉपलेस होण्याचे वचन, म्हणाली, ‘यावेळी ब्रा पण काढेन’
VIDEO: कियारा अडवाणीच्या ड्रेसने दिला धोका, गर्दीत घसरला गाऊन; झाली oops मोमेंटची शिकार
रोहित-कोहली नाही तर ‘या’ भारतीय खेळाडूने जिंकले गावसकरांचे मन, IPL मध्ये घालतोय धुमाकूळ