Share

पाच वेळच्या चॅम्पिअन असलेल्या मुंबई संघावर नामुष्की, सलग आठवा पराभव; केएल राहुलचे शतक

पाच वेळचा चॅम्पियन संघ मुंबई इंडियन्स (MI) IPL 2022 मधून बाहेर पडण्याच्या मार्गावर आहे. 24 एप्रिल रोजी लखनौ सुपर जायंट्स (LSG) विरुद्धच्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा पराभव झाला. या मोसमात मुंबईचा हा सलग आठवा पराभव असून त्यांनी आतापर्यंत एकही सामना जिंकलेला नाही.

अशा स्थितीत मुंबईला प्ले ऑफमध्ये स्थान मिळवणे आता अशक्य आहे. कर्णधार केएल राहुलच्या शानदार शतकामुळे (103*) लखनौ सुपर जायंट्सने या सामन्यात 168 धावा केल्या. पण मुंबई इंडियन्सला ही धावसंख्या गाठता आली नाही. रोहित शर्मा, तिलक वर्मा, कीरॉन पोलार्डच्या छोट्या खेळीनंतरही संघाला 36 धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले.

मोसमातील आठही सामने हरणारा मुंबई इंडियन्स पहिला संघ ठरला आहे. आता या मोसमात मुंबई इंडियन्सचे एकूण 6 सामने बाकी आहेत, मात्र केवळ 12 गुणांसह प्ले ऑफमध्ये पोहोचणे कठीण आहे. या सामन्यातही मुंबई इंडियन्सची सुरुवात खराब झाली, खराब फॉर्मशी झुंजत असलेला इशान किशन विचित्र पद्धतीने अवघ्या 8 धावा करून बाद झाला.

कर्णधार रोहित शर्मा काहीशा रंगात दिसला आणि त्याने शानदार फटके मारले पण त्यालाही केवळ 39 धावा करता आल्या. रोहित-इशानशिवाय डेवाल्ड ब्रेव्हिस (३४ धावा), सर्यकुमार यादव (७ धावा) यांना दोन अंकी आकडाही स्पर्श करता आला नाही. लखनौच्या इनिंगचा स्टार पुन्हा एकदा कर्णधार केएल राहुलने मुंबईच्या गोलंदाजांवर कहर केला.

केएल राहुलने या मोसमातील दुसरे शतक झळकावले असून दोन्ही शतके मुंबई इंडियन्सविरुद्ध झळकावली आहेत. राहुलने आपल्या डावात 103 धावा केल्या आहेत. यावेळी क्विंटन डी कॉक लवकर बाद झाला आणि त्याला भेटलेल्या जीवनदानाचा त्याला फायदा उठवता आला नाही. त्याच्यानंतर मनीष पांडे (22 धावा) कर्णधार केएल राहुलसोबत खेळला, पण त्याला मोठी धावसंख्या उभारता आली नाही.

मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करणाऱ्या किरॉन पोलार्डने धक्का दिला आणि त्याने लगेचच दोन विकेट घेतल्या. लखनौची मधली फळी ढासळली आणि मार्कस स्टॉइनिस, कृणाल पांड्या, दीपक हुडा यांना मोठा डाव खेळता आला नाही. त्यानंतर मुंबईची खराब सुरूवात झाली. आजही मुंबईच्या चाहत्यांच्या हाती निराशाच आली. पाच वेळची चॅम्पिअन असलेली मुंबईची ही अवस्था पाहून चाहते हैराण आहेत.

महत्वाच्या बातम्या
मोदींच्या कार्यक्रमाकडे पाठ फिरवत मुख्यमंत्री ठाकरे सहकुटुंब ‘फायर आजीं’च्या भेटीला
मंगेशकर कुटुंबीयांची ‘ही’ भूमिका अगम्य, हा १२ कोटी मराठी माणसांचा अपमान; आव्हाड भडकले
“मंगेशकर कुटुंबियांची ‘ही’ कृती १२ कोटी मराठी माणसांचा अपमान करणारी”
“हनुमान चालीसा वाचून जर प्रश्न सुटणार असतील तर नरेंद्र मोदींच्या घरासमोर हनुमान चालीसा वाचावी”

ताज्या बातम्या खेळ

Join WhatsApp

Join Now