आयपीएल २०२२ च्या १४ व्या सामन्यात कोलकाता नाईट आणि मुंबई इंडियन्स यांच्यात जबरदस्त सामना पाहायला मिळाला. या सामन्यात केकेआरने ५ गडी राखून विजय मिळवला. या सामन्यात एकवेळ अशी आली होती की मुंबईचा संघ हा सामना आरामात जिंकत होता, पण एकाच ओव्हरमध्ये लगातार सिक्सर बसल्याने संपूर्ण सामनाच पलटला. ती ओव्हर होती डॅनियल सॅम्सची. (mumbai indians daniel sams)
रोहित शर्माच्या संघासाठी त्यांचा एक खेळाडू खलनायक ठरला. हा खेळाडू दुसरा कोणी नसून मुंबईचा वेगवान गोलंदाज डॅनियल सॅम्स होता. सॅम्स मुंबईसाठी १६ वे षटक टाकण्यासाठी आला होता. पण त्याने या सामन्यात ३५ धावा दिल्या आणि मुंबईनेच इथेच सामना गमावला.
या षटकाच्या पहिल्या चेंडूवर केकेआरचा खेळाडू पॅट कमिन्सने लांबलचक षटकार ठोकला. यानंतर पुढच्या चेंडूवर चार, नंतर सहा, नंतर पुन्हा सहा मग नो बॉलवर दोन धावा. हे प्रकरण इथेच संपले नाही, त्यानंतर सॅम्सच्या पुढच्या दोन चेंडूंवर एक चौकार आणि एक षटकार मारला गेला.
या सामन्यात केकेआरकडून पॅट कमिन्स केकेआरसाठी हिरो ठरला. या खेळाडूने अवघ्या १५ चेंडूत नाबाद ५६ धावांची खेळी केली. कमिन्सने आपल्या खेळीत ४ चौकार आणि ६ लांब षटकार मारले. मात्र आश्चर्याची बाब म्हणजे या खेळाडूने डाव खेळण्यासोबतच एक विक्रमही आपल्या नावावर केला आहे, ज्यासाठी फलंदाजही तळमळत आहेत.
आजपर्यंत तीन सामने मुंबई खेळली पण तिन्ही सामन्यात मुंबईला पराभवाचा सामना करावा लागला. राजस्थान विरुद्ध सामन्यात मुंबई जिंकणार होकी, पण युझवेंद्र चहलच्या गोलंदाजीवर सॅम्स मोठा शॉट मारायलागेला आणि आऊट झाला. त्यामुळे मुंबईने तिथे सामना गमावला.
दिल्लीविरुद्धची मॅचही मुंबईच्या हातात होती, पण डॅनियलने एकाच ओव्हरमध्ये २४ धावा दिल्या. दिल्लीचा सामना जिंकणे सहज शक्य झाले आणि हा सामना मुंबईच्या हातातून निसटला. केकेआर विरुद्धच्या सामन्यात तर सलग चौकार आणि षटकार दिल्यामुळे मुंबईने सामना गमावला. सॅम्सच्या या कामगिरीमुळे रोहित शर्मा त्याची हकालपट्टी करु शकतो.त्यामुळे त्याच्याऐवजी दुसऱ्या खेळाडूला संधी मिळू शकते.
महत्वाच्या बातम्या-
मुलीच्या लग्नासाठी नव्हते पैसे, आईने रचलं थरारक कारस्थान; वाचून बसेल जबर धक्का
VIDEO: मालकासाठी नव्हे तर ‘या’ साठी 8 KM रुग्णवाहिकेच्या मागे धावला घोडा; कारण वाचून रडालं
अंगठे बहादूर महिलेनी केली कमाल! स्ट्रॉबेरी शेतीतून कमवित आहे लाखो रुपये; महिलांसाठी बनली एक प्रेरणास्रोत