यंदाच्या आयपीएल सिजनमध्ये गुजरात टायटन्स आणि लखनऊ सुपर जाएंट्स चांगल्याच फॉर्ममध्ये दिसत आहे. पण पाच वेळा चॅम्पियन झालेल्या मुंबई इंडियन्सची कामगिरी यावेळी खुप खराब आहे. त्यांनी ११ पैकी फक्त २ सामने जिंकले आहे. त्यांच्या या कामगिरीमुळे कर्णधार रोहित शर्मावर टीका केली जात आहे. तर काहींनी अर्जून तेंडूलकरला संघात संधी देण्याचे सुचवले आहे. (mumbai indians arjun tendulkar cooking)
अर्जुन तेंडुलकर हा आयपीएल २०२२ मधील मुंबई इंडियन्स संघाचा भाग आहे आणि तो अजूनही त्याच्या आयपीएल पदार्पणाची वाट पाहत आहे. यावेळीच्या आयपीएल लिलावात अर्जुन तेंडुलकरवर मुंबईने ३० लाखांची बोली लावली होती आणि त्याला संघात घेतले होते. मात्र आतापर्यंत या खेळाडूला चालू आयपीएलमध्ये एकही सामना खेळण्याची संधी मिळालेली नाही.
अर्जुन तेंडुलकर मैदानावर फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये त्याला आपले कौशल्य दाखवता आलेले नाही. पण तो मैदानाबाहेर मात्र आपले टॅलेंट दाखवताना दिसत आहे. सध्या त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तो चक्क जेवण बनवत आहे.
भारताच्या महान फलंदाजांपैकी एक असलेला सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये तो कुकिंगमध्ये आपले कौशल्य दाखवताना दिसत आहे. अर्जुन तेंडुलकरचा सहकारी धवल कुलकर्णीने हा व्हिडिओ शेअर केला आहे.
या व्हिडिओमध्ये अर्जुन तेंडुलकर स्वयंपाक करताना दिसत आहे. अर्जुन तेंडुलकरचा व्हिडिओ शेअर करताना धवल कुलकर्णीने ‘मास्टरशेफ’ असे कॅप्शन दिले आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून त्यावर अनेकजण वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहे. हा व्हिडिओ पाहून चाहते सुद्धा हैराण झाले आहे.
तसेच अर्जुन तेंडुलकर व्यतिरिक्त मुंबई इंडियन्सच्या संघात असलेला डेवाल्ड ब्रेविस देखील स्वयंपाक करताना दिसला आहे. दरम्यान, मुंबई इंडियन्सचा संघ सध्याच्या आयपीएल सिजनमधील ११ सामन्यांपैकी ९ सामने गमावल्यामुळे आधीच प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे.
महत्वाच्या बातम्या-
राजकारण तापलं! राज ठाकरेंपाठोपाठ आदित्य ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला कडाडून विरोध
राज साहेबांच्या केसाला जरी धक्का लागला तर.., राज ठाकरेंना धमकी आल्यानंतर मनसे आक्रमक
निलेश राणेंचा थेट पवारांवर हल्लाबोल; ‘५० वर्ष आमदार, एवढ्या वर्षात काय केलं?’