Share

तुम्ही कोणता सामाजिक न्याय केलाय? मुंबई उच्च न्यायालयाने धनंजय मुंडेंना झाप झाप झापले

राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे हे त्यांच्या निर्णयामुळे चर्चेत येत असतात. आता पुन्हा एकदा ते चर्चेत आले आहे. त्यांनी सोलापूर येथील मूक-बधिर मुलांसाठीची शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला होता. पण या निर्णयाला उच्च न्यायालाने स्थगिती दिली आहे. (mumbai high court angry on dhananjay munde)

न्यायालयाने धनंजय मुंडे यांच्या निर्णयाला विरोध केला आहे. तसेच मुंबई उच्च न्यायालयाने यावेळी धनंजय मुंडे यांना फटकारले सुद्धा आहे. सोलापूरातील मूक-बधिरांची शाळा बंद करण्यामागे धनंजय मुंडे यांचा तर्क काय आहे? असा सवाल न्यायालयाने उपस्थित केला आहे.

शाळेचे आभार मानण्याऐवजी तुम्ही शाळेचे रजिस्ट्रेशन रद्द करता. हा कसला सामाजिक न्याय आहे? तुम्ही कोणता सामाजिक न्याय केलात? असे प्रश्न न्यायालयाने उपस्थित केले आहे. तसेच त्यानंतर उच्च न्यायालायाने या निर्णायला स्थगिती दिली आहे.

तसेच माजरेवाडी येथील श्री गुरुदेव स्कूल फॉर डेफ अँड म्युट चिल्ड्रेनने केलेल्या याचिकेवर योग्य ते उत्तर दाखल करण्याचे आदेशही यावेळी उच्च न्यायालयाने दिले आहे. ही शाळा ऑक्टोबर २००३ साली जय भवानी संस्थेकडून चालवण्यात येत होती.

२००३ मध्ये जवळपास ५० विद्यार्थी येथे शिक्षण घेत होते. या शाळेला २९ मे १९९९ कलम १९९५ अंतर्गत रजिस्ट्रेशनचे प्रमाणपत्र देखील मिळाले होते. पण ४ ऑक्टोबर २०१९ रोजी अचानक रात्री ८ वाजता शाळेच्या तपासणीसाठी आयुक्त आले. त्यानंतर जून २०२० मध्ये शाळेचे रजिस्ट्रेशन काढून घेण्यात आले. त्यानंतर एकदाही शाळेला आपले म्हणणे मांडण्याचा वेळ मिळाला नाही.

याप्रकरणी संस्थेने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. शाळेचे रजिस्ट्रेशन रद्द करण्याचा निर्णय कोणाचा होता असा सवाल न्यायालयाने सरकारी वकीलांना केला होता. त्यावर सरकारी वकीलांनी हा निर्णय मंत्र्यांनी घेतला होता, असे सांगितले. असे उत्तर मिळताच असे निर्णय मंत्रीच घेऊ शकतात, असा टोला न्यायालयाने धनंजय मुंडेंना लगावला आहे.

महत्वाच्या बातम्या-
महाराष्ट्र हादरला! जन्मदात्या आईने पोटच्या मुलांचा केला खून, नंतर जाळली प्रेतं; कारण वाचून हादराल
साकीनाका बलात्कार प्रकरणात आरोपी मौहन चौहानला फाशीच, एक वर्षाच्या आतच लावला निकाल
मांसबंदी झाल्यानंतर मुस्लिम मालकाने बदलले हॉटेलचे नाव, स्टाफ आणि जेवण; म्हणाला, ‘पर्याय नाही’

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now