Share

मुकेश अंबानीने लाईट घालवून मुंबईला जिंकवलं; चेन्नईचे फॅन्स तापले, भन्नाट मीम्स व्हायरल

इंडियन प्रीमियर लीग २०२२ च्या ५९ व्या सामन्यात मुंबई इंडियन्सने चेन्नई सुपर किंग्जचा ५ गडी राखून पराभव केला. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळवण्यात आलेला सामना मुंबई इंडियन्सने ३१ चेंडू राखून जिंकला. या विजयासह चेन्नई सुपर किंग्जचे आयपीएल २०२२ च्या प्लेऑफमध्ये पोहोचण्याचे स्वप्नही भंगले. (mumbai chenani ipl meme viral)

मुंबई इंडियन्सच्या डॅनियल सॅम्सला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. मुंबईच्या या विजयानंतर मुंबईच्या खात्यात दोन गुण जमा झाले, पण पॉईंट्स टेबलमध्ये त्यांच्या आणि चेन्नईच्या स्थानात कोणताही बदल झालेला नाही. कारण दोन्ही संघ आधीपासून पॉईंट्स टेबलमध्ये खालच्या स्थानी आहे.

या सामन्यात मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. यावेळी फलंदाजी करताना चेन्नईला १६ षटकांत फक्त ९७ धावा करता आल्या. त्यांची आयपीएलमधील ही दुसरी सर्वात कमी धावसंख्या आहे. लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सने १४.५ षटकात ५ गडी गमावत १०३ धावा केल्या आणि सामना जिंकला.

अशात या सामन्यामध्ये एक भलताच प्रकार घडल्याचे समोर आले. या सामन्याच्या सुरुवातीला स्टेडियमच्या काही भागात वीजपुरवठा खंडित झाला होता. त्यामुळे कर्णधारांना टॉस करायलाही वेळ लागला. त्यानंतर सामना सुरु झाला होता.

तसेच चेन्नईचा संघ जेव्हा फलंदाजीला उतरला तेव्हा डीआरएसचा पर्यायही उपलब्ध नव्हता. यादरम्यान चेन्नईचे दोन फलंदाज एलबीडब्ल्यू झाले आणि त्यांच्याकडे रिव्ह्यू करण्याचा पर्याय नव्हता. त्यामुळे सोशल मीडियावर अनेक मीम्स बनवले जात आहेत.

मुंबईच्या जिंकण्यामागे प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांचा हात आहे, असे चाहते म्हणताना दिसत आहे. लाईट गेल्यामुळे चेन्नईच्या संघाला याचा मोठा फटका बसला. चेन्नईच्या काही फलंदाजांना डीआरएस घ्यायचा होता. पण लाईटच नसल्यामुळे त्यांना काहीच करता आले नाही आणि तंबूत परतावे लागले. त्यामुळे चेन्नईचे चाहते मुंबईवर चांगलेच भडकले आहे. काहींनी तर लाईट गेली म्हणून मुंबई जिंकली असे म्हटले आहे.

https://twitter.com/ShrirangSaraf/status/1524762568870428672?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1524762568870428672%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fnavbharattimes.indiatimes.com%2Fsports%2Fcricket%2Fiplt20%2Fnews%2Fipl-2022-memes-went-viral-after-power-cut-at-wankhede-stadium-during-csk-vs-mi-match%2Farticleshow%2F91522564.cms

 

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now