Share

मुंबई भाजपा नगरसेवकांचं टेन्शन वाढलं; सर्व्हेतून झाला मोठा खुलासा, पक्षनेतृत्व घेणार मोठा निर्णय?

bjp

राज्यातील राजकीय समीकरनांमद्धे बदल झाल्यानंतर येणारी पहिलीच मुंबई महानगर पालिकेची निवडणूक आता सर्वांचे लक्ष वेधून घेतं आहे. याचबरोबर मुंबई महानगर पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडताना पाहायला मिळतं आहे.

गेल्या २५ वर्षापासून मुंबई महापालिकेवर शिवसेनेची एकहाती सत्ता आहे. मात्र मागील निवडणुकीत हे चित्र काहीस वेगळं पाहायला मिळालं. मागच्या निवडणुकीत भाजपानं शिवसेनेला चांगलीच टक्कर दिली होती. शिवसेना-भाजपा यांच्यातील संख्याबळ खूप कमी होते.

यामुळे फक्त शिवसेनेचे २ नगरसेवक जास्त निवडून आले होते. तर आता आगामी मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकीत चित्र अजून काहीस वेगळं पाहायला मिळणार असल्याच बोललं जातं आहे. याचे कारण असे की, एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यामुळे शिवसेनेत दोन गट पडले आहेत.

अशातच एक मोठी बातमी समोर येतं आहे. भाजपानं आगामी मुंबई महापालिका निवडणुका जिंकण्यासाठी सर्व्हे केला होता. या सर्व्हेतून स्पष्ट दिसतं आहे की, मुंबईतील भाजपा नगरसेवकांचं टेन्शन वाढणार आहे. मिळालेल्या महाइतीनुसार, सर्व्हेत एकूण नगरसेवकांपैकी ५० टक्के नगरसेवक अकार्यक्षम असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.

दरम्यान, सर्व्हेतून आलेल्या माहितीची दखल घेत आता पक्षनेतृत्वाने याची गंभीर दखल घेतली असल्याची देखील माहिती मिळाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सर्वेतून म्हंटलं आहे की, ५० टक्के नगरसेवकांच्या मतदारसंघात त्यांच्यावर अकार्यक्षमतेचा ठपका ठेवण्यात आला आहे.

यामुळे आगामी मुंबई महानगर पालिका निवडणुकीत ५० टक्के नगरसेवकांना पत्ता कट होण्याचीही शक्यता जास्त असल्याचं आता बोललं जातं आहे. या निवडणुकीत भाजपला जिंकलेल्या ८२ जागा टिकवणे आणि दुसऱ्या क्रमांकावरच्या ५८ जागांपैकी किमान ३० जागा जिंकण्याचे ध्येय ठेवावे लागणार आहे. या निवडणुकीत आता कोण बाजी मारणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महत्त्वाच्या बातम्या
Raj Thackeray : मनसे – शिंदे गट महापालिका निवडणूका एकत्र लढवणार?, राज ठाकरेंनी बोलावली तातडीची बैठक
Garba : आता गरब्याच्या ठिकाणी बिगरहिंदूंना प्रवेश नाही; लव्ह जिहाद थांबवण्यासाठी मोठा निर्णय
दाभोळकर हत्या तपासाबाबत कुटुंबीयांचे गंभीर आरोप, पोलिसांची पोलखोल करत केला ‘हा’ दावा
“यापुढे फडणवीसच राज्याचे मुख्यमंत्री राहिले पाहिजेत”, बावनकुळेंच्या वक्तव्याने शिंदेंची उडाली झोप

इतर ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now