Share

प्रकृती नाजूक असतानाही मुक्ता टिळक मुंबईला रवाना; म्हणाल्या, ‘पक्षाचा आदेश रक्तात भिनलेला…’

mukta tilak

राज्यसभा निवडणुकीतील धक्कादायक निकालानंतर आता विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीपुढे सहाही जागा जिंकण्याचे आव्हान आहे.या निवडणुकीत ‘अकरावा’ म्हणजे पराभूत होणारा उमेदवार कोण असेल याचीच उत्सुकता आहे. आज सकाळी 9 वाजता राज्याच्या विधान परिषदेच्या १० जागांसाठीच्या मतदानाला सुरुवात झाली आहे.

एक – एक मत या निवडणुकीत सर्वच पक्षांना महत्त्वाच आहे. आपला उमेदवार निवडून यावा म्हणून प्रत्येक मताचं योग्य गणित बसवण्याचे नियोजन राजकीय पक्षांनी केलं आहे. सध्या राजकीय वर्तुळासह संपूर्ण राज्याचे लक्ष आज या निवडणूकीकडे लागले आहे. निकाल देखील आजच समोर येणार आहे.

असे असतानाच पुण्याच्या भाजपच्या आमदार मुक्ता टिळक (bjp mla mukta tilka) या सर्व आमदारांसाठी आदर्श ठरल्या आहे. मुक्ता टिळक या कर्करोगाशी झुंज देत आहेत. मात्र असे असताना देखील त्या आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी त्या पुण्याहून मुंबईकडे रवाना झाल्या आहेत.

मुंबईकडे रवाना होताना मुक्ता टिळक यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या, पक्षाने दिलेला आदेश पाळायचा, हे आमच्या रक्तामध्ये भिनलेलं आहे. त्यामुळे मी आज मतदानाला जात असल्याच मुक्ता टिळक यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.

पुढे बोलताना त्यांनी सांगितलं आहे की, ‘राज्यसभा निवडणुकीत आमचे उमेदवार विजयी झाल्यानंतर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बोलणे झाले. त्यावेळी त्यांनी माझे आभार मानले,” याचबरोबर पुढे बोलताना मुक्ता टिळक यांनी म्हंटलं आहे की, “पक्षातील सर्वचजण काळजी घेतात. त्यामुळे विशेष ममत्व वाटतं.’

दरम्यान, मुक्ता टिळक या राज्यसभा निवडणुकीत मतदान करण्यासाठीदेखील रुग्णवाहिकेतून आल्या होत्या. त्यावेळचे त्यांचे फोटो देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते. याचबरोबर पिंपरीचे आमदार लक्ष्मण जगताप यांनी देखील आपला मतदानाचा हक्क बजावला होता.

महत्त्वाच्या बातम्या
करुणा शर्मा यांच्यावर पुण्यात गुन्हा दाखल, जातीवाचक शिवीगाळ आणि नैसर्गिक अत्याचार केल्याचा आरोप
विधान परिषद निवडणुकीत देखील फडणवीसांचा करिश्मा! मविआतील पहिला आमदार फुटला?
‘मिल्ट्रीत जाणारा वाघ पैशांसाठी जात नाय, तो कुठल्या भावनेनं तिथं जातो हे तुझ्या डोक्याबाहेरचं’
अखेर सदाभाऊकडून भांडाफोड! ‘तो’ हॉटेलवाला राष्ट्रवादीचा कार्यकर्ता; पुरावा केला सादर

इतर ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now