विनोद खन्ना बॉलीवूडचे सर्वात मोठे सुपरस्टार आहेत. ८० च्या दशकामध्ये विनोद खन्ना बॉलीवूडचे एकमेव असे अभिनेते आहेत. ज्यांची पर्सनॅलिटी अमिताभ बच्चनला टक्कर देण्यासारखी होती. विनोद खन्नाला त्यांच्या अभिनयामुळे खुप जास्त प्रसिद्धी मिळाली होती. पण त्याचबरोबर विनोद खन्ना त्यांच्या स्वभावासाठी देखील खुप ओळखले जायचे. कारण त्यांचा स्वभाव खुप प्रेमळ आणि शांत होता.
पण शांत स्वभाव असणाऱ्या विनोद खन्नाला एकदा खुप जास्त राग आला होता. त्यांनी रागामध्ये येऊन महेश भट्टचे भाऊ मुकेश भट्टच्या कानाखाली वाजवली. चला तर मग जाणून घेऊया असे काय झाले. ज्यामुळे विनोद खन्नाने मुकेश भट्टच्या कानाखाली वाजवली.
विनोद खन्ना आणि महेश भट्टची मैत्री –
विनोद खन्ना आणि महेश भट्टची खूप घट्ट मैत्री होती. विनोद खन्ना मेरा गांव मेरा देश चित्रपटाची शुटींग करत होते. या चित्रपटात महेश भट्ट देखील सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करत होते. या चित्रपटाच्या सेटवर या दोघांची मैत्री झाली होती.
ओशोच्या आश्रमामधून परत आल्यानंतर विनोद खन्नाने बॉलीवूडमध्ये परत येण्याचा निर्णय घेतला. पण ते ओशोच्या आश्रमामध्ये असताना महेश भट्ट बॉलीवूडमध्ये एक दिग्दर्शक झाले होते. एवढेच नाही तर महेश भट्टने भाऊ मुकेश भट्टसोबत मिळून विशेष चित्रपट निर्मितीची कंपनी सुरु केली होती. या प्रोडक्शन हाऊसमधून महेश भट्टने पुजा भट्टला देखील लॉन्च केले होते.
याच प्रोडक्शन हाऊसमध्ये महेश भट्ट जुर्म चित्रपट बनवत होते. या चित्रपटामध्ये विनोद खन्ना मुख्य भुमिकेत होते. या चित्रपटाच्या शुटींग सुरु झाली होती. या चित्रपटाच्या सेटवर विनोद खन्ना आणि महेश भट्ट ब्रदर्समध्ये भांडणे झाली होती. त्याचे झाले असे की, या चित्रपटामध्ये विनोद खन्ना मुख्य भुमिकेत होते. पण त्यांना या चित्रपटाचे पुर्ण पैसे मिळाले नव्हते.
त्यानंतर काही दिवसांनी महेश भट्टचे भाऊ मुकेश भट्टने विनोद खन्नाला त्यांचे पुर्ण पैसे दिले. पण त्याच्या दुसऱ्याच दिवशी महेश भट्ट त्यांच्याकडे आले आणि पैशांची थोडी अडचण झाली असे त्यांना सांगितले. त्यामूळे विनोद खन्नाने त्यांना मिळालेले पैसे परत दिले.
त्यानंतर काही दिवसांनी परत मुकेश भट्टने विनोद खन्नाचे राहिलेले पैसे त्यांना दिले. पण त्यावेळीसुद्धा महेश भट्ट विनोद खन्नाकडे आले आणि त्यांनी परत एख दुखभरी कहाणी सांगून ते पैसे परत नेले. एकदा नाही दोनदा नाही तर चार वेळा असेच झाले. त्यामूळे विनोद खन्नाला या गोष्टीचा खुप राग आला. ते रागात मुकेश भट्टच्या ऑफिसमध्ये गेले आणि त्यांनी मुकेश भट्टच्या दोन कानाखाली वाजवली.
ही गोष्ट महेश भट्टला समजताच ते तिथे आले. त्यांनी विनोद खन्नाला सांभाळले आणि हे भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला. महेश भट्टला जेव्हा याबद्दल विचारण्यात आले. त्यावेळी त्यांनी असे काही झाले नाही म्हणून सांगितले होते.
महत्वाच्या बातम्या
टीना अंबानींच्या मुलाच्या लग्नात बच्चन कुटुंबाचीच हवा, महागडे दागिने घालून पोहोचले लग्नात, पहा फोटो
मैत्रिणींसमोर मुलीला ओरडणे पडले चांगलेच महागात; राग डोक्यात घेऊन मुलीने उचलले टोकाचे पाऊल
”जनतेने आतापर्यंत इतका बेशर्म, नालायक मुख्यमंत्री पाहिला नाही की जो..,” भाजपा आमदाराची जीभ घसरली
”जनतेने आतापर्यंत इतका बेशर्म, नालायक मुख्यमंत्री पाहिला नाही की जो..,” भाजपा आमदाराची जीभ घसरली