Share

शेजाऱ्यासोबत लग्न करण्यासाठी मारली करोडोंच्या संपत्तीला लाथ, वाचा मुकेश अंबानींच्या बहिणीबद्दल..

प्रेमासाठी घरदार सोडून गडगंज संपत्तीला लाथ मारत प्रियकरासोबत आयुष्यभर राहण्याचा निर्णय घेणारं प्रेमी युगुल फक्त सिनेमातच पाहायला मिळते असं नाही. वास्तविक जगात आपल्या आसपास पण अशा स्टोरी घडत असतात. भारतातील प्रसिध्द उद्योजक अंबानी यांच्या घरातली ही स्टोरी आहे. जी फार कोणाला माहित नसावी. मुकेश अंबानींची बहिण दिप्तीने दत्तराज साळगावकार या व्यक्तीला आपला जीवनसाथी म्हणून निवडलं. त्या दोघांची ही प्रेम कहाणी..

सुरुवातीच्या काळात धीरूभाई अंबानी मुंबईच्या उषा किरण या इमारतीत राहत होते. तिथे त्यांच्या शेजारी राहायला असलेल्या वासुदेव साळगावकर यांच्या कुटुंबाशी त्यांचा स्नेह होता. त्या दोन कुटुंबात चांगले संबंध होते. वासुदेव साळगावकर यांच्या दत्तराज या मुलाशी दिप्ती यांचे प्रेम जुळले. ५ वर्ष ते दोघे रिलेशनशीपमध्ये होते. दीप्ती यांनी दत्तराज यांसोबत १९८३ ला लग्नगाठ बांधली. दोन्ही कुटुंबांनी त्यांच्या नात्याचा आनंदाने स्वीकार केला होता.

वडील वासुदेव साळगावकर यांच्या निधनानंतर त्यांचा व्यवसाय सांभाळण्याची जबाबदारी दत्तराज यांच्यावर आली. गोव्याला जाण्याचा निर्णय त्यांनी घेतला परंतु दिप्ती त्यासाठी तयार नव्हत्या. अखेर आपल्या पतीसोबत तिकडे जाण्याचा निर्णय त्यांनी घेतलाच. दिप्ती यांना खूप तडजोडी कराव्या लागल्या, मुंबईच सुखी जीवन सोडून त्या गोव्याला स्थायिक झाल्या.

साळगावकर यांचाही तिकडे उद्योगात मोठा जम बसला, साळगावकर यांची एक कंपनी आहे, ती लोह खनिज खाणकाम, रियल ईस्टेट, आरोग्य सुविधा या क्षेत्रांत काम करते. या काळामध्ये त्यांनी भरपूर मेहनत घेतली त्यात दिप्ती यांची कायम सोबत त्यांना होती. साळगावकर हे उच्च शिक्षित आहेत. त्यांनी मुंबई युनिव्हर्सिटीमधून bacholar degree घेतली, पेंसिल्व्हिया युनिव्हर्सिटी येथून MBA केलं. दीप्ती यांनाही अभ्यासाची आवड आहे.

दीप्ती आणि दत्तराज या दाम्पत्याला २ मुलं आहेत. इशिता असे मुलीचे नाव असून विक्रम हे मुलाचे नाव आहे. विक्रम याने बिझनेस स्कूलमधून शिक्षण घेतले आहे तर इशिता पत्रकार असून कला विषयांत तिला रुची आहे. दीप्ती ह्या मुकेश व अनिल अंबानी या दोन्ही भावांची लाडकी बहिण आहेत, दोघांमधले वाद मिटवण्यास दीप्ती यांची महत्वाची भूमिका असते.

अशा प्रकारे अब्जाधीशा घरची लेक असून दीप्ती यांनी प्रेमापोटी साधेपणाने आयुष्य जगले, प्रकाश झोतापासून त्या दूर राहिल्या, आयुष्यातल्या सगळ्या चढ-उतारांमध्ये त्यांनी आपल्या पतीची सोबत केली. प्रेम अमूल्य असते ज्याची किंमत पैशांत करता येत नाही. हेच दीप्ती साळगावकर यांची प्रेम कहाणी सांगून जाते.

महत्वाच्या बातम्या
२६४ किमी पायी चालत आला रामचरणचा फॅन, दोन गोनी तांळासोबत आणले ‘हे’ खास गिफ्ट
अंजना सिंगला रोमँटिक अंदाजात पाहून रवी किशन झाले बेभान, आवेशात येऊन केलं असं काही..
२६४ किमी पायी चालत आला रामचरणचा फॅन, दोन गोनी तांळासोबत आणले ‘हे’ खास गिफ्ट
गोपीचंद पडळकर भडकले! थेट रोहीत पवारांचा बापच काढला; म्हणाले, तुमच्या बापाने…

ताज्या बातम्या इतर

Join WhatsApp

Join Now