प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्याकडे अफाट संपत्तीसह आलिशान कारचे कलेक्शनही आहे. त्यांना वेगवेगळ्या गाड्यांची प्रचंड आवड आहे. आताही त्यांनी अशी एक एसयुव्ही खरेदी केली आहे, ज्या एसयुव्हीची चर्चा सगळीकडेच रंगली आहे. तसेच या एसयुव्हीची किंमत ऐकूनही तुम्हाला धक्का बसण्याची शक्यता आहे. (mukesh ambani new suv)
मुकेश अंबानी यांनी आता कॅडिलॅकची नवीन एस्केलेड एसयूव्ही कार घेतली आहे. ही कार खुप लक्झरी असल्यामुळे सोशल मीडियावर मुकेश अंबानी चांगलेच चर्चेत आले आहे. सध्या इंटरनेटवर या एसयूव्हीचा एकच फोटो दिसत आहे, जो कार क्रेझी इंडिया नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे.
अंबानीचे ही कॅडिलॅक एस्केलेड सिल्व्हर कलर फिनिशमध्ये आले आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, अधिकृतपणे कॅडिलॅक भारतात त्यांची वाहने विकत नाही, याचा अर्थ मुकेश अंबानींनी ही एसयूव्ही खाजगीरित्या आयात केली आहे. या कंपनीच्या जगभरात खुप महागड्या आणि डिझाईनिंग कार आहे.
अंबानींची या कारमध्ये खुप वेगवेगळे फिचर्स आहेत. वायरलेस फोन चार्जर, सॉफ्ट क्लोज डोअर्स, कीलेस एंट्री, क्रूझ कंट्रोल इ. कंपनीने ते अनेक एआय आधारित तंत्रज्ञानाने सुसज्ज केले आहे. या कारचे सेल्फ ड्रायव्हिंग तंत्रज्ञान सर्वात सुरक्षित मानले जाते. कंपनीने यामध्ये अनेक कॅमेरे वापरले आहेत, जे कारच्या बाहेरील स्थिती दर्शवतात. सेल्फ ड्रायव्हिंग सुरक्षित करण्यासाठी त्यात ऑटो लेन चेंज, लेन चेंज अलर्ट आणि कोलिजन अलर्ट सारखे फीचर्स देण्यात आले आहेत. गाडीसमोर अचानक माणूस किंवा प्राणी आल्यास ही गाडी स्वतःहून थांबते.
ही कार भारतात उपलब्ध नाही. ती बनवणाऱ्या जनरल मोटर्सने भारतातील आपला व्यवसाय बंद केला आहे. ती आयात करून भारतात आणता येते, त्यामुळे भारतात या कारची किंमत आणखी वाढते. जर तुम्ही ते इतर कोणत्याही देशात खरेदी केले आणि आयात केले तर भारतात त्याची किंमत १.३ कोटी ते १.७ कोटी रुपयांपर्यंत असू शकते.
हॉलीवूडमध्येही ही एसयूव्ही अनेक सुपरस्टार वापरतात, अगदी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षही कॅडिलॅक एस्केलेड गाडी चालवतात. भारतातही ही एसयूव्ही केवळ मुकेश अंबानींकडेच नाही, इतरही लोक आहेत ज्यांनी ती विकत घेऊन भारतात आणली आहे.
महत्वाच्या बातम्या-
VIDEO: आकाश ठोसरसोबत डेटच्या चर्चांनंतर रिंकूने पोस्ट केले खास reel, चाहते झाले घायाळ
थेरगाव क्वीनसोबत व्हिडिओ बनवणाऱ्याची पोलिसांना पाहताच टरकली, म्हणाला…
सलमान खानमुळे ‘Valentine Day’ला कतरिना होणार विकी कौशलपासून लांब; ‘हे’ आहे कारण