भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि झारखंडचा सर्वात मोठा करदाता महेंद्रसिंग धोनी सध्या गुडघ्याच्या दुखीमुळे थोडा त्रासलेला आहे. अशा स्थितीत धोनी त्याच्या गुडघ्यांवर देशात किंवा परदेशात महागड्या हॉस्पिटलमध्ये उपचार करून घेत असेल असे तुम्हाला वाटत असेल, पण तसे नाही. (ms dhoni treatment)
धोनी सध्या जंगलातील स्थानिक वैद्यांकडून गुडघ्यावर उपचार घेत आहे. तसेच धोनीचा झाडाखाली वैद्यासोबत बसून उपचार घेतानाचा फोटोही व्हायरल होत आहे. वैद्य बंधनसिंग खरवार सांगतात की, जेव्हा महेंद्रसिंग धोनी त्याच्यावर उपचार करायला आला तेव्हा त्याला ‘माही’ समोर बसला आहे याची जाणीवही नव्हती.
तसेच टीव्हीवर दिसणं आणि समोर दिसणं यात खूप फरक असल्याचं त्यांनी सांगितलं. महेंद्रसिंग धोनीवर वन्य औषधी वनस्पतींच्या मदतीने उपचार करणारे वैद्य बंधनसिंग खरवार सांगतात की, प्रत्येक रुग्णाप्रमाणे तेही धोनीकडून एका औषधाच्या डोससाठी ४० रुपये घेतात.
महेंद्रसिंग धोनी सामान्य रुग्णांप्रमाणे रांचीपासून सुमारे ८० किमी अंतरावर असलेल्या लापुंगमधील गलगली धाममध्ये पोहोचला होता. गेल्या एक महिन्यापासून धोनी त्याच्या गुडघ्यांवर उपचार घेत आहे. तसेच त्याचे उपचार घेतानाचे फोटोही व्हायरल होत आहे.
धोनी इथे उपचार घेण्यासाठी येताच असंख्य चाहते जमा होऊ लागतात. म्हणूनच आता तो गावात पोहोचतो आणि गाडीत बसतो, जिथे त्याला औषधाचा डोस दिला जातो. मिळालेल्या माहितीनुसार, धोनी गेल्या एक महिन्यापासून उपचारासाठी जंगलात येत आहे. अशा स्थितीत यादरम्यान गावातील अनेक लोकांनी त्याच्यासोबत फोटोही काढले आहेत.
महेंद्रसिंग धोनी लपुंग यांच्या गलगली धाममध्ये देशी गायीचे दूध, झाडाची साल आणि अनेक वनौषधींपासून बनवलेले औषध घेत आहे. महेंद्रसिंग धोनीच्या पालकांनीही येथूनच उपचार करून घेतल्याचे सांगण्यात येत आहे. वैद्य सांगतात की लोक सकाळपासूनच त्यांच्या तिथे उपचार घेण्यासाठी येऊ लागतात.
महत्वाच्या बातम्या-
एका भीषण अपघातामुळे झाले ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्याचे करिअर बर्बाद; आज जगतोय असं जीवन
PHOTO: लायगर चित्रपटासाठी विजय देवरकोंडा झाला न्युड, प्रायव्हेट पार्टवर ठेवला फक्त पुष्पगुच्छ
उद्धव ठाकरेंचा दुबईतील राईट हॅंड; भाजप नेत्याने नाव फोडत अख्खी कुंडलीच समोर आणली