Share

केकेआरविरुद्धच्या सामन्यात धोनी बनवणार ‘हा’ मोठा विक्रम; होऊ शकतो विराट, रोहितच्या लिस्टमध्ये सामील

चेन्नई सुपर किंग्जचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी इंडियन प्रीमियर लीगच्या १५ व्या सिजनमध्ये नवीन विक्रम बनवू शकतो. अलीकडेच महेंद्रसिंग धोनीने चेन्नई सुपर किंग्जचे कर्णधारपद रवींद्र जडेजाकडे सोपवले आहे. महेंद्रसिंग धोनी २००८ च्या सिजनपासून चेन्नई संघाचे नेतृत्व करत होता. (ms dhoni make new record in ipl)

चेन्नई सुपर किंग्जने धोनीच्या नेतृत्वाखाली ४ विजेतेपदे जिंकले आहेत. तसेच त्याच्यामुळे संघ ९ वेळा वेळा लीगचा अंतिम सामना खेळला आहे. याशिवाय महेंद्रसिंग धोनीही यावेळी एक विक्रम करू शकतो. धोनी ७ हजार टी-२० धावांपासून ६५ धावा दूर आहे, त्यामुळे धोनीला कोलकात्याविरुद्धही हे विक्रम करण्याची संधी असेल.

महेंद्रसिंग धोनीपूर्वी ५ भारतीय फलंदाजांनी टी-२० फॉरमॅटमध्ये ७ हजारहून अधिक धावा केल्या आहेत. भारतीय फलंदाजांमध्ये आतापर्यंत फक्त आरसीबीचा माजी कर्णधार विराट कोहली (१०२७३), रोहित शर्मा (९८९५), शिखर धवन (८७७५), सुरेश रैना (८६५४) आणि रॉबिन उथप्पा (७०४२) यांनी टी-२० फॉरमॅटमध्ये ७ हजार धावा पूर्ण केल्या आहेत. .

टी-२० फॉरमॅटमध्ये महेंद्रसिंग धोनीने ३४७ सामन्यांच्या ३०६ डावांमध्ये ३८.३१ च्या सरासरीने ६९३५ धावा केल्या आहेत. धोनीने आतापर्यंत २७ अर्धशतके केली आहेत. धोनी ३०६ डावांपैकी १२५ डावांमध्ये नाबाद राहिला आहे. धोनीने भारतीय संघासाठी ९८ टी-२० सामन्यांमध्ये ३७ च्या सरासरीने १६१७ धावा केल्या आहेत.

आयपीएलमध्ये महेंद्रसिंग धोनीने २२० सामन्यांमध्ये ४७४६ धावा केल्या आहेत. जागतिक क्रिकेटमध्ये आतापर्यंत ३३ फलंदाजांनी टी-२० फॉरमॅटमध्ये ७ हजारांहून अधिक धावा केल्या आहेत. दरम्यान, चेन्नई सुपर किंग्जचा पहिला सामना कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होणार आहे.

हा सामना इंडियन प्रीमियर लीगच्या १५ व्या सिजमधील पहिलाच सामना असणार आहे. चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार म्हणून रवींद्र जडेजा पहिल्यांदाच आपल्या नव्या इनिंगला सुरुवात करणार आहे. त्याचबरोबर श्रेयस अय्यर पहिल्यांदाच कोलकाता संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे.

महत्वाच्या बातम्या-
नराधम कुटुंबीयांनीच लुटली अल्पवयीन मुलीची अब्रु; वडील, मामाने वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन..
VIDEO: मुंबईच्या गगनचुंबी इमारतीत माधूरीने बांधले अलिशान घर; पहा नव्या घराची खास झलक
महत्वाची बातमी! सरकारने इनकम टॅक्सच्या नियमांत केले मोठे बदल, आधीच घ्या जाणून..

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now