Share

धोनीचा व्हायरल फोटो पाहून चाहत्यांना धक्का, क्रिकेट सोडून निवडणुकीच्या ड्युटीवर करतोय काम?

चेन्नई सुपरकिंग्सचा आयपीएल २०२२ मधील प्रवास पूर्ण झाला आहे. एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली या सिजनमध्ये हा संघ गुणतालिकेत ९ व्या क्रमांकावर होता. सुरुवातीला या संघाचे नेतृत्व रविंद्र जडेजाने केले, पण नंतर पुन्हा धोनीला कर्णधार करण्यात आले होते. पण सध्या धोनी एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. (ms dhoni election duty viral photo)

धोनी हा झारखंडची राजधानी रांचीचा असून, सध्या झारखंडमध्ये पंचायत निवडणुका होत आहेत. झारखंडमध्ये सुरू असलेल्या निवडणुकीसाठी धोनी निवडणूकीच्या ड्युटीमध्ये गुंतला असल्याचा एक फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. हा फोटो पाहून धोनीचे चाहतेही हैराण झाले आहे.

एका व्हायरल फोटोमुळे झारखंडमध्ये सुरू असलेल्या पंचायत निवडणुकांशी धोनीचे नाव जोडले गेले आहे. पण खरं पाहता रांचीमध्ये निवडणूक ड्युटी दरम्यान ज्याला लोकांनी धोनी समजले आहे तो व्यक्ती विवेक कुमार आहे, जो सीसीएलच्या एका विभागात सहाय्यक व्यवस्थापक आहे. तो निवडणूकीच्या कामात व्यस्त असून मतमोजणी केंद्रावर कर्तव्य बजावत आहेत. विवेक कुमार याला तिसऱ्या टप्प्यातील निवडणुकीसाठी उभे केले आहे. त्याचा चेहरा हा थोडाफार धोनीसारखाच दिसतो.

दरम्यान, चेन्नई सुपर किंग्सने आयपीएल २०२२ मध्ये शेवटचा सामना राजस्थान विरुद्ध खेळला. या सामन्यात धोनीने खुलासा केला होता की, सीएसकेसाठी हा त्याचा शेवटचा सामना नाही, तो पुढे आयपीएलमध्ये खेळेल. धोनी म्हणाला होता, नक्कीच, मी पुढच्या वर्षीही खेळणार आहे. जर शेवटचा सामना चेन्नईत नाही खेळला तर चाहत्यांसाठी ते अयोग्य ठरेल.

तसेच मुंबई एक अशी जागा आहे जिथे मला एक क्रिकेटपटू आणि एक व्यक्ती म्हणून खूप प्रेम आणि आपुलकी मिळाली आहे. तसेच पुढच्या वर्षीही संघ वेगवेगळ्या ठिकाणी सामने खेळणार आहे. तिथेही अनेक चाहत्यांकडून आम्हाला प्रेम मिळणार आहे, असेही धोनीने म्हटले आहे.

एमएस धोनीसाठी आयपीएल २०२२ खूप चांगले ठरली. या सिजनमध्ये संघाने काही खास कामगिरी केली नसेल, परंतु एमएस धोनीने अनेक शानदार खेळी खेळल्या. या सिजनमध्ये एमएस धोनीने १४ सामन्यात ३३.१४ च्या सरासरीने २३२ धावा केल्या. या सिजनमध्ये त्याने १ अर्धशतकही झळकावले.

महत्वाच्या बातम्या-
गुजरात फायनलमध्ये पोहोचताच हार्दिक पांड्याच्या डोक्यात गेली हवा, म्हणाला, माझं नाव विकलं जातं त्यामुळं..
एका पायावर लंगडत शाळेत जाणाऱ्या अपंग मुलीच्या मदतीला धावून आला सोनू सूद; म्हणाला…
“सगळी प्रॉपर्टी विकली तरी या सायकलची सर येणार नाही”, वडिलांच्या आठवणीत वसंत मोरे भावुक

ताज्या बातम्या खेळ

Join WhatsApp

Join Now