विविध मालिकांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील मराठीतील आपली लाडकी अभिनेत्री मृणाल दुसानिस हिने नुकतीच एक गुडन्यूज शेअर केली. अमेरिकास्थित अभिनेत्रीला २४ मार्च रोजी कन्यारत्न प्राप्त झाले. ही आनंदाची बातमी तिने आपल्या सोशल मिडिया अकाऊंटवरून शेअर केली आहे.
मृणाल ही मूळची नाशिकची असून तिने पत्रकारितेतून आपले शिक्षण पूर्ण केले आहे. शिक्षण चालू असतानाच तिने विविध मॉडेलिंगला सुरुवात केली. तसेच रंगभूमीवरही तिने अभिनय केला आहे. २०११ मध्ये आलेल्या माझिया प्रियाला प्रीत कळेना या मालिकेतून तिच्या करियरला खर्या अर्थाने सुरुवात झाली.
सोज्वळ, सालस आणि सहजसुंदर अभिनयाने तिने प्रेक्षकांची मने जिंकली. यानंतर तिच्या तू तिथे मी, अस्सं सासर सुरेख बाई, सुखांच्या सरींनी हे मन बावरे या मालिका देखील खूप गाजल्या. मराठीतील प्रसिद्ध नाटक श्रीमंत दामोदरपंत यावर आधारित चित्रपटातही तिने महत्वाची भूमिका साकारली आहे. एक उत्तम सून, मुलगी, बायको अशा अनेक भुमिका पडद्यावर गाजवल्यानंतर आता वैयक्तिक आयुष्यात नविन भूमिकेसाठी ती सज्ज झाली आहे.
२०१६ मध्ये अमेरि्कास्थित नीरज मोरे यांचेशी ती विवाहबद्ध झाली. यानंतरही तिने आपले करियर आणि कुटूंब यात चांगला समतोल राखला. सध्या ती अमेरिकेतच वास्तव्यास आहे. काहीच महिन्यापुर्वी तिने एका पोस्ट मध्ये ही आनंदाची बातमी शेअर केली होती. दरम्यान, आज सकाळीच बाळाचा फोटो शेअर करत तिने बाळाचे नुर्वी असे ठेवले असल्याचे सोशल मिडियावरुन जाहिर केले.
महत्वाच्या बातम्या
राधे माँचा मुलगा आहे हँडसम हंक, दिसण्यात देतो मोठमोठ्या अभिनेत्यांना टक्कर; पहा फोटो
फेसबुकची मैत्री भोवली; गायछापचा वारसदार भासवून लावला चुना, वाचा नेमकं प्रकरण काय?
पतीला झालेल्या कॅन्सरविषयी अभिज्ञा भावेने दिली मोठी अपडेट; भावूक होत म्हणाली…
एसटी कर्मचाऱ्यांचा ३१ मार्चचा अल्टिमेटम संपला, संपकऱ्यांबाबत अनिल परबांनी घेतला मोठा निर्णय; म्हणाले…