ठाकरे सरकारमधील अनेक बडे नेते हे त्यांच्या वादग्रस्त विधानांनी सतत चर्चेत असतात. अशातच महाविकास आघाडी सरकारमधील शिवसेनेचे खासदार विनायक राऊत ( Vinayak Raut ) हे त्यांच्या एका विधानाने चांगलेच चर्चेत आले होते. ब्राह्मण समाजावर केलेले विधान त्यांच्या चांगलच अंगलट आलं होतं.
औरंगाबाद येथे आयोजित पत्रकार परिषदेत राऊत ( Vinayak Raut ) यांनी ब्राह्मण समाज व हिंदुत्वाविषयी वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यामुळे राज्यातील ब्राह्मण संघटना आक्रमक झाल्या होत्या. राऊतांनी बिनशर्त माफी मागावी अन्यथा त्यांचा दशक्रिया विधी करण्यात येईल, असा गर्भित इशारा ब्राह्मण सेवा संघाने दिला होता.
सर्व स्तरातून राऊत यांच्यावर टीकेचा भडीमार झाला अखेर राऊत यांनी जाहीर माफी मागितली आहे. काही चूक झाली असेल तर माफ करा, असे म्हणत त्यांनी माफी मागितली आहे. तर जाणून घेऊया नेमकं राऊत म्हणाले काय होते? त्याच्या विधानानंतर राज्यातील ब्राह्मण संघटना आक्रमक का झाल्या?
औरंगाबाद (Aurangabad) येथे राऊत ब्राह्मण समाजाच्या भेटीला पोहचले त्यावेळी त्यांनी ब्राम्हण समाजाविषयी वादग्रस्त वक्तव्य केलं. ते म्हणाले, शेंडी-जानव्याचे हिंदुत्व आम्हाला मान्य नाही. त्यामुळे त्यांच्या या विधानावर ब्राह्मण समाज समन्वय समितीने आक्षेप घेत राऊतांनी तात्काळ माफी मागावी अशी मागणी त्यांनी केली होती.
राऊत यांच्यावर मोठ्या प्रमाणात टिका करण्यात आली. अखेर राऊत यांनी माफी मागितली. ‘काही कळत नकळत माझ्या तोंडून उद्गार निघाले त्यात कोणाचाही अनादर करणे हा उद्देश नव्हता. मी आज नतमस्तक आणि माफी मागायला आलो. काही चूक झाली असेल तर माफ करा, असे त्यांनी म्हंटले आहे.
पुढे बोलताना विनायक राऊत म्हणाले, तेलंगणात महाराष्ट्रातील शेतकरी शेती विकत घेतात. हे महाराष्ट्र सरकारचे अपयश नाही, आज महाराष्ट्रामध्ये मोठी वीज थकबाकी आहे. तरी देखील काही सवलती देत आहेत. काही येतील का मुख्यमंत्र्यांना भेटून याबाबत सांगू.’ ब्राह्मण समाजाच्या भावना नक्की मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवणार असल्याचे देखील राऊत म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
शूटींगच्या लंचब्रेकमध्येच देवानंदने केले होते लग्न; खूपच रोमॅंटीक आहे बॉलीवूडच्या एव्हरग्रीन हिरोची लव्हस्टोरी
प्रकाश आंबेडकरांनी निवडणुकीत एक हजार कोटी घेतले; शिवसेना आमदाराचा खळबळजनक आरोप
द काश्मीर फाइल्स पाहून महिलेने केलं असं काही की दिग्दर्शकही झाला भावूक; म्हणाला, माझ्याकडे शब्दच नाहीये…
‘फडणवीसांच्या काळातच दारू घरपोहोच देण्याचा निर्णय घेण्यात आला होता’, अजित पवारांनी विरोधकांना सुनावलं