Share

नुपूर शर्माला फाशी द्या; खासदार इम्तियाज जलिल यांनी केंद्र सरकारकडे केली मागणी

jalil
काही दिवसांपूर्वी एका टिव्ही शोमध्ये बोलत असताना भाजप प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. नुपूर शर्मा यांनी पैंगबर मोहम्मद यांच्याबद्दल केलेल्या विधानामुळे देशभरात गदारोळ माजला. सहा वर्षांसाठी त्यांचे प्राथमिक सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे.

तसेच भाजप दिल्ली मीडियाचे प्रमुख नवीनकुमार जिंदाल यांनाही निलंबित करण्यात आले आहे. याचबरोबर मुस्लिम समाजातून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. नुपूर शर्मा यांच्यावर कारवाईची मागणी होत होती. प्रेषित पैगंबर यांच्याविषयीच्या वादग्रस्त विधानानंतर नुपूर शर्मा यांच्यावर संताप व्यक्त केला जात आहे.

अशातच नुपूर शर्मा यांना फाशी दिली पाहिजे. कोणत्याही धर्मविरोधात कोणी बोलत असेल तर त्यावर कडक कारवाई केली पाहिजे, अशी मागणी खासदार इम्तियाज जलील यांनी केंद्र सरकारकडे केली. ते याबाबत औरंगाबाद येथे बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी भाजपला देखील लक्ष केले.

यावेळी बोलताना जलील म्हणाले, ‘इतरांना छोट्या गोष्टींसाठी तुरुंगात टाकले जाते, मग शर्मा व जिंदाल यांच्यावर कारवाई का करण्यात आली नाही?, असा प्रतीसवाल इम्तियाज जलील यांनी सरकारला विचारला आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्रातील सोलापूर आणि औरंगाबाद शहरात मुस्लिम समाजाकडून जोरदार निदर्शने करण्यात आली आहेत.

तसेच देशातील दिल्ली, उत्तर प्रदेश, कर्नाटक आणि पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये मुस्लिम समाजाकडून आंदोलन करण्यात आले आहे. उत्तर प्रदेशातील अनेक शहरांमध्येही शुक्रवारच्या नमाजानंतर मोठ्या संख्येने मुस्लिम लोक रस्त्यावर जमा झाले होते. प्रयागराजमध्ये आंदोलनाच्या वेळी पोलिसांवर दगडफेक करण्यात आली आहे.

दरम्यान, पश्चिम बंगालची राजधानी असलेल्या कोलकाता शहरात मुस्लिम समाजाकडून भाजप प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे. यावेळी परिसरातील दुकाने जमावाकडून जबरदस्तीने बंद करण्यात आली असल्याचे सांगितले जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या 
इतर ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now