Share

हृदयद्रावक! १० दिवसांपासून आई बसली होती मुलीच्या कुजलेल्या मृतदेहाजवळ; नक्की घडलं तरी काय?

पश्चिम बंगालच्या हावडा येथील शिवपूर येथून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मृत मुलीच्या मृतदेहासोबत एक वृद्ध आई दहा दिवसांपासून राहत होती. मृतदेहाच्या दुर्गंधीमुळे पोलिसांना आणि आसपासच्या लोकांना घटनेची माहिती मिळाली. आता पोलिसांनी मृत मुलीचा कुजलेला मृतदेह घरातून बाहेर काढून पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आहे.  (mother seat next to death daughter)

मृत मुलीचे नाव श्यामली मल्लिक (४५) आणि आईचे नाव दीप्ती मल्लिक (७०) असे आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आई आणि मुलगी दोन महिन्यांपासून आजारी होते. त्याच्यात चालण्याचीही ताकद नव्हती. मुलगी श्यामलीचे आजारपणामुळे निधन झाले आहे. स्थानिक लोकांच्या मदतीने पोलिसांनी दीप्तीला पिण्याचे पाणी आणि जेवण दिले. काही दिवसांपासून आईने काहीच खाल्ले नव्हते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आई मुलीला नातेवाईकांनी कधीच शोधण्याचा प्रयत्न केला नाही. वृद्ध दीप्तीचा पुतण्या शुभदीप मल्लिक हा आई आणि मुलीला जेवण देण्यासाठी तिच्या घरी यायचा. मात्र गेल्या दहा दिवसांपासून तो आला नव्हता. शुभदीप रविवारी सकाळी त्यांच्या घरी गेला, तेव्हा त्याला धक्काच बसला.

त्याला घरातून एक विचित्र वास येत असल्याचे जाणवले, त्यामुळे घरात शिरला. त्यावेळी श्यामली मृतावस्थेत असल्याचे त्याने पाहिले. वृद्ध आई दीप्ती तिच्या मृतदेहाजवळ झोपली होती. घरातील हे दृश्य पाहून पुतण्या शुभदीप घाबरला आणि त्याने तत्काळ जवळच्या लोकांना आणि शिवपूर पोलीस ठाण्यात माहिती दिली. शिवपूर पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी घराचीही तपासणी केली.

दीप्ती म्हणाली की तिची काळजी घेणारे कोणी नाही. पती एका खाजगी कंपनीत कामाला होता. तीन वर्षांपूर्वी त्यांचे निधन झाले. त्यानंतर ती आणि मुलगी घरात एकटेच राहत होते. दीप्तीच्या भावाचा मुलगा शुभदीपने सांगितले की, तो वेळोवेळी जेवण घेऊन यायचा. पण काही दिवसांपासून त्याला इथे येणे शक्य झाले नव्हते.

दरम्यान, दीप्ती यांचे सुमारे चार एकर जमिनीवर घर आहे. काही लोकांनी घर घेण्याबाबतही बोलले होते, पण दीप्ती मल्लिक यांनी त्यांना नकार दिला होता. तेव्हापासून कोणीही नातेवाईक किंवा स्थानिक लोक त्याला मदत करत नव्हते. पोलिसांनी आता तपास सुरू केला असून आजूबाजूच्या लोकांची चौकशी करण्यात आली आहे.

महत्वाच्या बातम्या-
जाणून घ्या कोण आहे हिंदुस्थानी भाऊ?, ज्याच्या आवाहनावर शेकडो विद्यार्थ्यांनी ठाकरे सरकारला फोडला घाम
“कोण ढोकळा विकतो ते सोडा, वाईनच्या धंद्यात पार्टनरशीप कशी मिळाली ते सांगा?”
सलमान अफजल तर मी छत्रपती शिवाजी महाराज, कोथळा बाहेर काढेन; बिचुकलेचे वादग्रस्त वक्तव्य

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now