राज्यात गेल्या काही दिवसांपासून अनेक धक्कादायक घटना समोर येत आहे. अनेक घटना या माणूसकीला काळीमा फासणाऱ्या आहे. असे असतानाच एक भयानक घटना समोर आली आहे, ज्यामुळे संपुर्ण औरंगाबादनमध्ये एकच खळबळ उडाली आहे. एका आईने आपल्याच मुलाचा जीव घेतल्याची घटना औरंगाबादमध्ये घडली आहे. (mother murder son aurangabad)
वैजापूर तालुक्यातील खंडाळा गावात ही भयानक घटना घडली आहे. आपल्या प्रेमात अडचण ठरत असल्यामुळे एका आईने प्रियकराच्या मदतीने आपल्याच मुलाचा जीव घेतला आहे. सार्थक रमेश बागूल असे मृत मुलाचे नाव असून तो फक्त ९ वर्षांचा होता.
या प्रकरणी पोलिसांनी सार्थकची आई संगीता रमेश बागूल आणि तिचा प्रियकर साहेबराव माणिकराव पवार यांना अटक केली आहे. एक आई इतकी क्रुक असे असू शकते? असा प्रश्न सर्वांना पडला असून या घटनेमुळे संपूर्ण गावातून संताप व्यक्त केला जात आहे.
पोलिसांना वैजापूरमधील तलवाडा शिवारातील जंगलातल्या दरीत १७ फेब्रुवारीला एक मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळला होता. तसेच ११ फेब्रुवारी रोजी संगीताने आपल्या मुलाची अपहरणाची तक्रार पोलिस ठाण्यात नोंदवली होती. त्यामुळे पोलिसांनी मतदेहाचे कपडे आणि इतर गोष्टी दाखवताच संगीताने तो आपलाच मुलगा असल्याचे सांगितले.
ओळख पटली होती, पण पोलिस आरोपीच्या शोधात होते. तपास सुरु करताच सुरुवातीला त्यांना आईवरच संशय आला, त्यामुळे पोलिसांनी तिला ताब्यात घेतले. तेव्हा तिने आपणच प्रियकरासोबत मिळून त्याचा खुन केल्याचे कबूल केले आहे. त्यामुळे पोलिसांनी तिच्यासह तिच्या प्रियकरालाही ताब्यात घेतले.
मुलाने आपल्याला आपल्या प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत बघितले होते. त्यामुळे तो आपल्या प्रेमात अडथळा ठरत होता. म्हणून प्रियकरासोबत मिळून मी त्याचा खुन केला आहे, असे मुलाच्या आईने म्हटले आहे. मुलाचे प्रेत पाहून सुद्धा आईच्या डोळ्यात अश्रू नव्हते, त्यामुळे पोलिसांना तिच्यावर संशय आला होता.
महत्वाच्या बातम्या-
४० वर्षानंतर इतिहास घडणार; ऑलिम्पिक स्पर्धा आयोजनाच्या दृष्टीने भारताचे पहीले पाऊल
‘जय भवानी’ घोषणा बाबासाहेबांचीच, पुरावे दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे उभे करणे फार सोपे आहे पण.., नाना पाटेकरांचे वक्तव्य चर्चेत