पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाच्या अंतिम अर्दाससाठी बुधवारी मोठी गर्दी झाली होती. पंजाबच्या कानाकोपऱ्यातून लोक पंजाबमधील मानसा जिल्ह्यातील मूसा गाव येथे पोहोचले. सुमारे एक लाख लोकांचा जमाव तेथे पोहोचल्याचा दावा केला जात आहे. (moosewala father on sidhu)
शेवटच्या अर्दास दरम्यान, सिद्धू मुसावालाचे वडील आणि आई भावूक झाले. त्यांचा मुलगा जवळच आहे, तो कुठेही गेला नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी सिद्धू मुसेवालाबद्दल सांगितले की, तो लहानपणापासूनच अडचणीत मोठा झाला, नेहमी आईकडून गंध लावून बाहेर पडणार सिद्धू निधनाच्या दिवशी तसाच बाहेर पडला होता.
अखेरच्या अर्दासनंतर सिद्धूचे वडील बलकौर सिंह म्हणाले की, ते आवाजाच्या माध्यमातून सिद्धूला जिवंत ठेवतील. ते म्हणाले की, त्यांचा मुलगा स्वखुशीने राजकारणात गेला होता. त्याचे नाव कोणत्याही वादात अडकू देऊ नका आणि त्याच्याकडून काही चूक झाली असेल तर त्याला माफ करा.
वडील सरदार बलकौर सिंह म्हणाले, ‘न्याय मिळेपर्यंत मी गुडघे टेकणार नाही. माझ्या मुलाचे नाव वादात ओढू नका. मी स्वतः थेट जाऊन पुढे काय करायचे ते सांगेन. जर मला काही तुम्हाला सांगायचे असेल तर मी माझ्या मुलाच्या यूट्यूब चॅनेल आणि फेसबुक पेजद्वारे लाईव्ह येईन. सिद्धूच्या नावाच्या कोणत्याही फेसबुक पेज, इन्स्टाग्रामवर विश्वास ठेवू नका.
बलकौर सिंह म्हणाले, २९ मे हा दिवस इतका वाईट होता की त्याचे निधन झाले. पण तुमच्या प्रेमाने माझे दु:ख खूप कमी झाले. सिद्धू हा अतिशय साधा तरुण होता. तो सर्वसामान्य पंजाबी मुलासारखा होता. तो शाळेत शिकत असताना कधी बसने तर कधी स्कूटरने मी त्याला घ्यायला जायचो. दुसरी पासून तो सायकलने शाळेत जायला लागला. इयत्ता १२ वीपर्यंत तो दररोज २४ किलोमीटर सायकल चालवून शाळेत जायचा.
सिद्धूबद्दल सांगताना बलकौर म्हणाले, मुलाला पॉकेटमनीही देऊ शकलो नाही. इथपर्यंत पोहोचण्यासाठी त्याने खूप मेहनत घेतली होती. आम्ही अगदी साध्या कुटुंबातील होतो. तो त्याची गाणी लिहायचा, विकायचा आणि कमवायचा आणि पुढचा अभ्यास करायचा. त्याने कधी खिशात पाकीटही ठेवले नव्हते.
२९ मे रोजी पहिल्यांदाच आई जवळच कुठेतरी गेली होती. त्यामुळे तो गंध न लावताच घरातून निघून गेला आणि जे नको तेच घडले. लहानपणापासून आजपर्यंत त्याने कधीही तक्रार केली नाही. मी कधीही चुकीच्या कामात सहभागी नाही, अशी शपथ त्याने घेतली होती. माझा मुलगा खूप छान होता, असेही त्यांनी म्हटले आहे.
भावूक होऊन सिद्धूचे वडील म्हणाले, माझा मुलगा संत होता. त्याने कधीही कोणाचे नुकसान केले नाही. माझ्या मुलाबद्दल अश्लील लिहू नका. सोशल मीडियावर चुकीचे लिहू नका. सिद्धूला कोणीही राजकारणात आणले नाही, तो स्वत:च्या इच्छेने गेला होता.
बलकौर सिंह म्हणाले, माझ्या मुलाकडून किंवा माझ्याकडून कधी चूक झाली असेल तर आम्हाला माफ करा. मी हात जोडून माफी मागतो. मुसेवालाच्या आईने भावनिक आवाहन केले आणि म्हणाल्या की, माझा मुलगा कुठेही गेला नाही, मला वाटते तो माझ्या आसपास आहे. आज प्रदूषण खूप वाढले आहे. माझ्या मुलाच्या नावाने एखादे झाड लावावे आणि त्यांचे संगोपन करावे.
महत्वाच्या बातम्या-
हरिवंशराय बच्चन यांनी जया-अमिताभसमोर ठेवली होती ‘ही’ अट, त्यानंतर झाले दोघांचे लग्न, पहा फोटो
नुपूर शर्मांची जीभ कापून आणणाऱ्याला १ कोटी रूपये बक्षीस देणार; ‘या’ पक्षाच्या घोषणेने खळबळ
VIDEO: मुंबई एअरपोर्टवर सलमान खानचे गैरवर्तन, गिफ्ट घेऊन आलेल्या चाहत्यासोबत केलं असं काही..