Share

मान्सून यंदा पाच दिवस आधीच लावणार हजेरी, जाणून घ्या काय सांगतोय हवामान खात्याचा अंदाज

गेल्या दोन महिन्यांपासून कडक ऊन पाहायला मिळत होते. तसेच उष्णतेची मोठी लाट आल्याचेही म्हटले जात होते. पण गेल्या काही दिवसांपासून राज्यातील वातावरण ढगाळ आहे. त्यामुळे राज्यात लवकरच मान्सून दाखल होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. (monsoon will arrive five days earlier this year)

फेब्रुवारी, मार्च, एप्रिलमध्ये भयंकर उकाडा पडला होता. त्यामुळे सगळेच नागरिक त्रस्त होते, असे असतानाच ही आनंदाची बातमी समोर आली आहे. यंदा वारे जोरात वाहत असल्याने मान्सून पाच दिवस आधीच राज्यात दाखल होऊ शकतो असे हवामान खात्याने म्हटले आहे.

मोसमी पाऊस हा रविवारी अंदामानमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. पाच दिवस आधीच मान्सून अंदामानात पोहचण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात सध्या असनी चक्रीवादळ आले होते. ते शमत असल्यामुळे कमी दाबाचे पट्टे तयार झाले आहे. त्यामुळे मान्सूनची वाट सुकर झाली आहे.

दक्षिण अंदमान आणि बंगालच्या उपसागरात १५ मे रोजीच मान्सून दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. बंगालच्या उपसागरात बुधवारी सायंकाळी कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. तर आंध्र प्रदेश आणि रायलसीमाच्या किनारपट्टीवर अतिवृष्टी होत आहे.

केरळमध्ये मान्सून २० ते २६ मेपर्यंत दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर तळकोकणात मान्सून २७ मे ते २ जून दरम्यान दाखल होणार आहे. २० मेपासून राज्यात पावसाचा इशारा देण्यात आला आहे. दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात २० ते २६ मेपर्यंत दाखल होण्याचा अंदाज आहे.

तसेच पुणे जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात २७ जूननंतरही पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. अरबी समुद्रात आर्द्रता वाढली आहे. त्यामुळे आता राज्यात ढगाळ वातावरण राहणार आहे. तसेच राज्यातील तापमानही कमी राहणार आहे.

महत्वाच्या बातम्या-
युएईचे राष्ट्राध्यक्ष शेख खलिफांचे निधन; भारतात मोदी सरकारने जाहीर केला राष्ट्रीय दुखवटा, राष्ट्रध्वज अर्ध्यावर
पाकिस्तानी सामान्य नागरिक आपले शत्रू नाहीत, तर…; शरद पवारांचे पाकिस्तानवर मोठे वक्तव्य
..तर तुमचा आदित्य वरळीतच कायमचा मावळला असता; मनसेने सेनेला उपकारांची आठवन दिली करून

ताज्या बातम्या राज्य

Join WhatsApp

Join Now