माकडांचा धुमाकूळ! ईव्हीएम कंट्रोल रुम परिसरातील ३४ सीसीटीव्ही कॅमेरे तोडले, अधिकाऱ्यांना बसला धक्का

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुक २०२२ संदर्भात अनेक घटना समोर येत आहे. अशात एक हैराण करणारी बातमी समोर आली आहे. सुरक्षेसाठी पिलीभीत मंडी समितीमधील निवडणूक नियंत्रण कक्षाच्या आसपास ५२ सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले होते. इलेक्शन ड्युटीवर तैनात असलेल्या अधिकाऱ्यांना त्यातील ३४ कॅमेरे फोडलेले दिसले. (monkey destroy 34 cctv)

सुरुवातीला अधिकाऱ्यांना वाटले की हे काम एखाद्या पक्षाच्या कार्यकर्त्यांचे असेल. त्यामुळे याबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्याची तयारीही सुरू होती. तक्रार करण्यापूर्वी या प्रकरणाची चौकशी केली असता हा कारनामा माकडांनी घडवून आणल्याचे समोर आले. माकडांच्या टोळक्याने मंडई समितीमध्ये बांधलेल्या नियंत्रण कक्षात घुसून कॅमेऱ्यांची मोडतोड केली. येथे ईव्हीएम आणि व्हीव्हीपीएटी मशीन ठेवण्यात आल्या आहेत.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, पिलीभीतच्या एडीएमने सांगितले की मंडी समितीमध्ये केलेल्या निवडणूक नियंत्रणाभोवती ५२ सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले होते. एका सीसीटीव्ही कॅमेऱ्याची किंमत २,५०० रुपये होती. ईव्हीएम आणि व्हीव्हीपीएटी मशीन ठेवण्यासाठी मंडईच्या आवारात स्ट्राँग रूम बनवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले होते. माकडांनी ५२ पैकी ३४ कॅमेऱ्यांचे नुकसान केले आहे. एडीएम म्हणाले की, आता माकडांना मंडी परिसरापासून दूर ठेवण्यासाठी तीन पथके तैनात करण्यात आली आहेत. एका संघात ९ सदस्य आहेत. या टीमने आतापर्यंत ७ माकडे पकडली आहेत. याशिवाय २५ सुरक्षा कर्मचारी तैनात आहेत, असेही अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. अधिकारी म्हणाले की, ईव्हीएम आणि व्हीव्हीपीएटी मशीन स्वतंत्र खोलीत ठेवण्यात आल्या होत्या आणि त्यांचे कोणतेही नुकसान झाले नाही.

पीलीभीतचे एडीएम म्हणाले की, खराब झालेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या जागी नवीन कॅमेरे बसवण्यात आले आहेत. सीसीटीव्ही कॅमेरे आणि दोरांच्या सुरक्षेसाठी ग्रीस लावण्यात आले आहे, जेणेकरून माकडे त्यांना तोडू शकत नाहीत. मंडई संकुलातील निवडणूक नियंत्रण कक्ष आणि स्ट्राँग रूमच्या आसपास तैनात असलेल्या वनविभागाच्या पथकाच्या प्रमुखांनी सांगितले की, प्रत्येक पथकाची जबाबदारी उप परिक्षेत्र अधिकाऱ्याकडे सोपविण्यात आली आहे.

तसेच या परीसरात एक वननिरीक्षक आणि वनरक्षकही तैनात करण्यात आले आहेत. याशिवाय इतर ६ वन कर्मचाऱ्यांनाही ड्युटीवर ठेवण्यात आले आहे. माकडांना मंडईच्या आवारापासून दूर ठेवणे एवढेच नाही तर त्यांना पकडून जंगलात सोडणे हे या टीमचे काम आहे.

महत्वाच्या बातम्या-
सोमय्यांना आज फक्त ड्रामेबाजी करायची होती ती शिवसैनिकांनी हाणून पाडली, कोर्लई गावच्या सरपंचांची टीका
अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या जावयाची सासूने केली हत्या, पुण्यातील धक्कादायक घटना
हत्या करुन सुप्रियाला सोफ्यात डांबणाऱ्या ‘त्या’ व्यक्तीला पोलिसांनी शोधले, एका चपलेवरुन झाला उलगडा