राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन होऊन सुमारे 2 वर्षांचा कालावधी पूर्ण झाला आहे. या दोन वर्षात सत्ताधारी पक्षातील नेत्यांकडून होणाऱ्या दादागिरीच्या अनेक घटना घडल्या आहेत. तसेच धक्कादायक बाब म्हणजे काही नेत्यांवर विनयभंगाचा गुन्हा देखील दाखल झाले आहे.
यामुळे सत्ताधारी पक्षातील नेत्यांना सत्तेचा माज आलाय का? असा सवाल सध्या राजकीय वर्तुळात उपस्थित झाला होता. असाच एक धक्कादायक प्रकार पुन्हा घडल्याचे उघडकीस आले आहे. मुलीला होस्टेलमध्ये सोडण्याच्या बहाण्याने राष्ट्रवादीच्या नेत्याने मुलीवर विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली आहे.
या प्रकरणी होस्टेल संचालक असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आरोपी सुमेद श्यामकुवर यांच्यावर बाल लैगिक अत्याचार (Child sexual abuse) प्रकरणीचा गुन्हा नोंद केला आहे. यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या गोटात खळबळ उडाली आहे. या प्रकरणावर अजूनही महाविकास आघाडी सरकारमधील कोणत्याच नेत्याने प्रतिक्रिया दिलेली नाहीये.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भंडारा (Bhandara) शहरातील राजीव गांधी चौकात असलेल्या यशोधन ग्रामीण शिक्षण संस्थेद्वारा संचालित महिला समाज गर्ल्स हॉस्टेलमध्ये ही पीड़ित मुलगी राहते. 25 फेब्रुवारीला सायंकाळच्या सुमारास आरोपी राष्ट्रवादीच्या नेत्याने पीड़ित मुलीच्या वडिलांना फ़ोन करत आपण मुलीला होस्टलमध्ये परत नेन्यासाठी आलो असल्याचे सांगितले.
वडिलांनी विश्वासाने आपल्या मुलीला आरोपी सुमेद श्यामकुवर यांच्या ताब्यात दिले. त्यानंतर आरोपीने पीडिताला आपल्या चारचाकी गाडी बसले आणि सुनसान जागी नेऊन गाडी थांबवली. आणि धक्कादायक बाब म्हणजे त्या आरोपीने पीडित अल्पवयिन मुलीचा विनयभंग केला.
श्यामकुवर पसार असून त्याला शोधण्यासाठी पोलीसांचे पथक रवाना झाल्याची माहिती आंधळगावचे ठाणेदार सुरेश मट्टामी यांनी दिली. पूर्वी कॉंग्रेसमध्ये असलेले आणि आता राष्ट्रवादीत आलेल्या शामकुवर यांच्यावर गुन्हा दाखल होताच जिल्ह्याच्या राजकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.
दरम्यान, रडत – रडत पीडित मुलीने सर्व हकीकत आपल्या मैत्रीनीला सांगितली. त्यानंतर मैत्रीणीने पीडिताच्या वडिलांना फोन करत घडलेली घटना सांगितली. आणि वडिलांच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यानंतर वडिलांनी आंधळगाव पोलिस स्टेशन गाठत आरोपी सुमेद श्यामकुवर विरोधात बाल लैगिक अत्याचार विरोधात गुन्हा नोंद केला आहे. सध्या या घटनेने खळबळ उडाली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
खोटा कळवळा दाखवणाऱ्या भाजप नेत्यांना मराठा आंदोलनात जाताना लाज कशी वाटत नाही?
मंत्री बच्चू कडू अडचणीत; ‘त्या’ प्रकरणात राज्यपालांनी दिले कठोर कारवाईचे आदेश
गंगुबाई काठियावाडी थिएटरवर ठरली फ्लॉप, साऊथच्या ‘या’ दोन चित्रपटांच्या निम्मीही झाली नाही कमाई
७०० कोटींची संपत्ती असणाऱ्या अशनीर ग्रोव्हर यांनी ‘Shark Tank India’ शो साठी घेतले तब्बल ‘इतके’ रुपये