Share

“संजय राऊतांना गरज लागली तेव्ही मी आर्थिक मदत केली”; मोहित कंबोज यांचा खळबळजनक दावा

sanjay raut

मंगळवारी (काल) शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेऊन भाजपावर हल्लाबोल चढवला. यावेळी बोलताना राऊत यांना भाजप नेते मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांच्याबद्दल एक प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी आपण मोहित कंबोज यांना ओळखत नसल्याचं विधान केलं.

तसेच पुढे बोलताना राऊत म्हणाले, ‘फडणवीसांचा फ्रंटमॅन मोहित कम्बोज आहे. मोहित कंम्बोज देवेंद्र फडणवीस यांना बुडवणार आहे, असे वक्तव्य राऊत यांनी केले होते. कम्बोजच्या कंपन्यांमध्ये पैसा कुठून आला हे फडणवीसांनाच माहिती आहे, असेही राऊत यांनी म्हटले होते.

आता भाजपा नेते मोहित कम्बोज यांनी संजय राऊत मला ओळखतात आणि त्यांना मी अनेकवेळा आर्थिक मदत केली आहे, असे म्हटले आहे. ते याबाबत पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते. “मला ओळखत नाही असे म्हणणारे राऊत माझ्या घरी ४ सप्टेंबर २०१७ रोजी आले होते. राऊत गणपतीसाठी माझ्या घरी येतात, असे राऊत म्हणाले.

पुढे बोलताना त्यांनी राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. राऊत यांना जेव्हाही आर्थिक मदत लागली तेव्हा मी त्यांना मैत्रीमध्ये मदत केली आहे. मला ओळखत नसल्याचे ते म्हणाले. त्यांना विसरण्याचा आजार झाला असल्याची खोचक टीका मोहित कम्बोज यांनी संजय राऊत यांच्यावर केली.

दरम्यान, संजय राऊत यांनी माझ्यावर केलेले सर्व आरोप निराधार असून आपण कोणत्याही चौकशीसाठी तयार असल्याचं मोहित कंबोज यांनी स्पष्ट केलं. माझ्यावर आरोप करणाऱ्या संजय राऊतांना राऊतांना मानहानी केल्याबद्दल कायदेशीर नोटीस पाठवणार असल्याचे देखील कंबोज म्हणाले.

‘राऊतसाहेब हे मोदींपासून सुरु करतात ते फडणवीसांवर येऊन थांबतात. मागील पाच महिन्यात हे सरकार माझ्यासारख्या माणसासोबत लढून जिंकू शकले नाहीत, असा टोला कंबोज यांनी लगावला. याबाबत पत्रकार परिषद घेत भाजपचे माजी पदाधिकारी मोहित कंबोज यांनी राऊतांनी केलेले सर्व आरोप फेटाळले.

महत्त्वाच्या बातम्या
‘या फुलाला सुगंध मातीचा’ मालिकेतील अभिनेत्रीची अवस्था पाहून चाहत्यांचे वाढले टेन्शन, पहा फोटो
बाॅलीवूडवर कोसळला दुखा:चा डोंगर! डिस्को म्युझिक आणलेल्या ज्येष्ठ संगीतकाराचे निधन
राकेश बापटने शमिता शेट्टीसोबत शेअर केला रोमॅंटिक व्हिडीओ, एक्स-वाइफने केली अशी कमेंट
..त्यामुळे प्लास्टिकपासून बनवलेले चमचे, ग्लास, झेंडे, इअरबड्स सगळं होणार बंद, सरकारचा मोठा निर्णय

 

इतर राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now