राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्या अडचणींमद्धे वाढ होताना पाहायला मिळत आहे. आठ तासांच्या चौकशीनंतर नवाब मलिक यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे. या अटकेने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादी – कॉंग्रेसचे नेते ईडी कार्यालयाबाहेर आक्रमक झाले आहेत. काही दिवसांपुर्वी आपण भंगारवाला असून मला त्याचा अभिमान आहे, असे नवाब मलिकांनी म्हटले होते. त्यानंतर भाजप नेते मोहित कंबोज यांनी त्यांच्यावर टीका केली होती जी सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
नवाब मलिकांच्या या विधानावरुनच भाजप नेत्यांनी त्यांच्यावर निशाणा साधण्यास सुरुवात केली होती. भाजप नेते मोहित कंबोज यांनी नवाब मलिकांवर गंभीर आरोप केले होते. भंगारवाला करोडपती कसा झाला? असा प्रश्न मोहित कंबोज यांनी उपस्थित केला होता.
राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्याकडे ३ हजार कोटींची संपत्ती आहे. त्यांच्या एकूण २२ संपत्त्या आहे, असा गौप्यस्फोट मोहित कंबोज यांनी केला होता. तसेच यावेळी त्यांनी एक भंगारवाला करोडोंच्या संपत्तीचा मालक कसा झाला असा सवालही त्यांनी उपस्थित केला होता.
मोहित कंबोज यांनी पत्रकार परिषद घेऊन नवाब मलिकांची पोलखोल करणार असल्याचे सांगितले होते. त्यापुर्वीच त्यांनी हा बॉम्ब टाकल्याने खळबळ उडाली होती. नवाब मलिकांकडे ३ हजार कोटींची बेनामी संपत्ती आहे. त्यांच्याकडे एकूण २२ संपत्त्या आहे. त्यांचे संपुर्ण कुटुंब फॅमिली ट्रस्टच्या नावाने जोडले गेले आहे, असे मोहित कंबोज यांनी म्हटले होते.
नवाब मलिकांची मी सगळी पोलखोल करणार आहे असंही ते म्हणाले होते. तसेच त्यांना तोंड दाखवायला जागा उरणार नाही. उत्तर देण्याचीही त्यांची लायकी उरलेली नसेल. या चित्रपटाचा एन्ड मीच करणार आहे. सलीम जावेदच्या चित्रपटाची खरी स्क्रिप्ट आणि खरा चेहरा जगासमोर येणार आहे, असा इशाराही मोहित कंबोज यांनी दिला होता. त्यानंतर आता नवाब मलिकांना अटक झाली आहे. आता मोहित कंबोज पुन्हा पत्रकार परिषद घेणार आहेत. ईडीने नवाब मलिकांवर कारवाई केल्यानंतर मोहित कंबोज यांनी ट्विट केलं होतं की सुबह पाच बजे उठा के ले के जाते है, इंसान खुद नहीं जाता!
https://twitter.com/mohitbharatiya_/status/1496334617091395595?s=20&t=uK_DO6WYlbQzeXyQTGnn5w
https://twitter.com/mohitbharatiya_/status/1496338952328196097?s=20&t=uK_DO6WYlbQzeXyQTGnn5w
https://twitter.com/mohitbharatiya_/status/1496362659972792321?s=20&t=uK_DO6WYlbQzeXyQTGnn5w
https://twitter.com/mohitbharatiya_/status/1496419190676549632?s=20&t=uK_DO6WYlbQzeXyQTGnn5w
महत्वाच्या बातम्या
श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेआधीच भारताला मोठा धक्का, ‘हा’ स्टार फलंदाज संघाच्या बाहेर
पिवळ्या साडीतील मॅडम परतल्या ड्युटीवर, मतदानाच्या दिवशी पुन्हा बनल्या चर्चेचा विषय
योगींच्या रॅलीमध्ये शेतकऱ्यांनी सोडले शेकडो गाय आणि बैल? ‘त्या’ व्हिडीओमागचे सत्य आले समोर
नवाब मलिकांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करायला लावणार, किरीट सोमय्यांचा इशारा