राज्यात भाजपला डावलून शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस या पक्षांनी मिळून महाविकास आघाडी सरकार स्थापन केले आहे. २ वर्षांचा कार्यकाळ देखील ठाकरे सरकार पूर्ण केला आहे. मात्र राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून भाजपा – शिवसेनामध्ये शाब्दिक युद्ध सुरू झाले आहे. (mohit kamboj bhartiya challenge sanjay raut)
अशातच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी थेट उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना पत्र लिहिलं आहे. नायडू यांना लिहिलेल्या पत्रात राऊत यांनी भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. दरम्यान, संजय राऊत (sanjay raut) यांच्या गंभीर आरोपांमुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे.
याच पार्श्वभूमीवर भाजपा नेते मोहित कंबोज यांनी राऊतांवर ‘महाराष्ट्रातील सलीम-जावेद जोडीतील जावेद’ असं म्हणत खोचक निशाणा साधला आहे. “मी तुम्हाला आव्हान देतो राऊतसाहेब. २०२२च्या महानगरपालिका निवडणुकीत तुमची चाणक्यनीती दाखवून द्या. मुंबईतला तुम्हाला वाटेल तो सर्वात सुरक्षित वॉर्ड घ्या आणि तिथून निवडणूक जिंकून दाखवा, असे आव्हान कंबोज यांनी दिलं आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले, सलीम जावेद जोडीतील राऊतांना माझा सवाल आहे. ४० वर्ष आपण शिवसेनेत आहात परंतु आजवर कोणती निवडणूक तुम्ही लढलात? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच देशभरात सगळीकडे शिवसेना आणि तिचा उमेदवार जिथे जिथे तुम्ही गेलात तिथे तुमचे डिपॅाजिट जप्त झाले, असे म्हणत त्यांनी राऊत यांच्यावर निशाणा साधला.
दरम्यान, राऊत यांनी या पत्रानंतर पत्रकार परिषद घेत अनेक खळबळजनक आरोप होते. ‘केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करून आमच्यावर खोटेनाटे आरोप केले जात आहेत. बदनाम करण्याचं काम सुरू आहे. ते भ्रमात आहेत. पण आम्ही या दडपशाहीला घाबरणार नाही. तुमची दादागिरी खपवून घेणार नाही. याद राखा, मुंबईत शिवसेनाच दादा आहे. आम्हीच मुंबईत दादागिरी करणार आहोत, असा इशारा राऊत यांनी दिला होता.
राऊतांनी मुंबईत शिवसेनाच दादा असल्याचं म्हणत आम्ही घुसलो तर नागपुरात जाणं मुश्किल होईल असं म्हणत फडणवीसांना आव्हान दिलं. यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केले. ते म्हणले, “सिंह कधीही गिधाडांच्या धमकीला घाबरत नाही. ईडी काय करते, का करते हे ईडी सांगेल. संजय राऊत सध्या व्हिक्टिम कार्ड खेळण्याचा प्रयत्न करत आहेत, असे म्हणत फडणवीस यांनी राऊत यांना प्रत्युत्तर दिले.
महत्त्वाच्या बातम्या
‘या’ कार्यक्रमात सिद्धार्थ जाधवसोबत दिसणार दिवंगत रमेश देव यांची शेवटची झलक, पहा व्हिडीओ
हिजाब वादावर कंगनाची प्रतिक्रिया; बिकिनीमध्ये बिचवरचा फोटो शेअर करत म्हणाली..
रानू मंडल पुन्हा आली चर्चेत, आता पुष्पा चित्रपटातील ‘श्रीवल्ली’ गाण्यावर केला भन्नाट डान्स, पहा व्हिडीओ
‘बच्चन पांडे’ फेम अभिनेत्री क्रिती सेनॉनचा नवीन लुक व्हायरल, फोटो पाहून चाहते म्हणाले ‘परमसुंदरी’