राष्ट्रवादीवर डाव उलटला! दाऊदच्या माणसाशी पवारांचेच जवळचे संबंध? भाजप नेत्याने पुरावाच दिला

राज्यात सध्या मशिदींवरील भोंगे आणि हनुमान चालिसा पठणावरुन वाद सुरु आहे. या वादामुळे विरोधी पक्षातील नेते आणि सत्ताधारी पक्षातील नेते एकमेकांवर टीका करताना दिसून येत आहे. तसेच काही नेते गंभीर आरोप करताना दिसून येत आहे. खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती रवी राणा यांना सध्या न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. (mohit kamboj allegation sharad pawar)

अशात संजय राऊतांनी नवनीत राणा यांच्यावर गंभीर आरोप केले होते. राणा यांनी कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमशी संबंध आणि ईडीने अटक केलेल्या युसूफ लकडवाला याच्याकडून ८० लाख रुपये घेतले होते, असा गंभीर आरोप राऊतांनी केला होता.

संजय राऊतांच्या या आरोपानंतर भाजप नेते मोहित कंबोज यांनी ट्विटरवर एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये युसूफ लकडवालासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार असल्याचे दिसून येत आहे. या फोटोमुळे आता या प्रकणाला वेगळे वळण लागण्याची शक्यता आहे.

मोहित कंबोज यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर दोन-तीन फोटो शेअर केले आहे. त्यापैकी एका फोटोत निळा कोट परीधान केलेला युसूफ लकडवाला दिसून येत आहे. तसेच त्याठिकाणी शरद पवारही दिसत आहे, असा दावा मोहित कंबोज यांनी केला आहे. त्यामुळे राऊत याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

दरम्यान, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी नवनीत राणा यांच्यावर गंभीर आरोप केला होता. नवनीत राणा यांनी दाऊदशी संबंधित असलेल्या युसूफ लकडवाला याच्याकडून ८० लाखांचं कर्ज घेतलं आहे, असा आरोप संजय राऊत यांनी राणांवर केला होता.

तसेच नवनीत राणा यांनी घेतलेल्या कर्जाबाबत ईडीने तपास करायला हवा. हा देश सुरक्षेचा प्रश्न आहे. तसेच ईडी याप्रकरणी नवनीत राणांची चौकशी करेल का? असाही प्रश्नही संजय राऊतांनी उपस्थित केला होता. पण अशात मोहित कंबोज यांनी शरद पवार आणि लकडवालाचा फोटो पोस्ट केल्याने याप्रकरणाला वेगळे वळण लागले आहे.

महत्वाच्या बातम्या-
तुमचा वाढो न वाढो ‘या’ पठ्ठ्यांचा पगार दरवर्षी वाढतो; पोलिसांनी अटक केलेल्यांची कहानी ऐकून बसेल धक्का
काश्मिरमध्ये भारतीय लष्कराच्या अधिकाऱ्यांनी केली नमाज अदा, व्हायरल फोटोंनी जिंकली लोकांची मने
मुलाच्या मृत्युनंतर ‘हे’ मोलाचे काम करत आहे सिद्धार्थ शुक्लाची आई, पाहून नेटकरीही झाले भावूक