Share

मोदींना मारण्याच्या व्हिडीओवर पटोलेंनी मारली पलटी; म्हणाले मी मोदी नावाच्या गुंडाबाबत…

सोशल मीडियावर दररोज कोणत्या ना कोणत्या नेत्याचा किंवा मंत्र्याचा व्हिडिओ व्हायरल होत असतो. अनेक वेळा राजकीय पक्षाचे नेते आपल्या बेताल वक्तव्यांमुळे वादात सापडतात. या वक्तव्यांमुळे काही वेळा राजकीय पक्षातील नेत्यांना टीकेचा सामना देखील करावा लागतो. काही वेळा या वक्तव्यांचा चुकीचा संदर्भ घेतला जातो. असाच काहीसा प्रसंग महाराष्ट्रातील काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याबाबतीत घडला आहे.

महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये काँग्रेस नेते नाना पटोले मोदींबाबत आक्षेपार्ह शब्दांत बोलत आहेत. व्हायरल व्हिडिओमध्ये नाना पटोले काही लोकांशी बोलताना दिसत आहेत. “मी मोदींना मारू शकतो आणि शिवीगाळ देखील करू शकतो.” असे ते बोलत आहेत.

हा व्हिडिओ पाहिल्यास आपल्याला असे वाटते की, नाना पाटोले पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत बोलत आहेत. या व्हिडिओवरून काँग्रेस नेते नाना पटोले यांच्यावर सर्व स्तरातून टीका होत आहे. पंतप्रधान मोदींबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे भाजप पक्षातील नेत्यांनी महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा निषेध केला आहे.

या वक्तव्यावरून भाजप पक्षाकडून त्यांच्या अधिकृत पेजवर एक ट्विट करण्यात आले आहे. “काँग्रेसमध्ये परंपरा असेल देशाच्या पंतप्रधानांना मारण्याची. देशाने दोन पंतप्रधान गमावले आहेत. सहज बोलले नाहीत, पटोलेंची चौकशी झाली पाहिजे. मोदीजींना मारण्यासाठी काँग्रेस आणि पाकिस्तान हे दोन गट सक्रिय झाले आहेत. आजकाल पाकिस्तानची भाषा काँग्रेस बोलत आहे”, असे ट्विटमधून भाजपने काँग्रेसवर टीका केली आहे.

या संपूर्ण प्रकरणावर काँग्रेस नेते नाना पटोले यांच्याकडून स्पष्टीकरण आले आहे. “माझ्या मतदारसंघातील मोदी नावाच्या स्थानिक गुंडाबाबत नागरिकांनी माझ्याकडे तक्रारी केल्या असता मी त्यांच्याशी बोलतानाचा व्हिडीओ खोडसाळपणे सोशल मीडियावर व्हायरल केला जात आहे.मी पुन्हा स्पष्ट करतो मी तिथे पंतप्रधान मोदींबद्दल नाही, तर मोदी नावाच्या स्थानिक गुंडाबाबत बोलत होतो”, असे काँग्रेस नेते नाना पटोले यांनी ट्विटमध्ये म्हंटले आहे.

यापूर्वी देखील नाना पटोले अनेकदा आपल्या विधानांमुळे चर्चेत आले होते. महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारवर वक्तव्ये करून त्यांनी ठाकरे सरकारच्या अडचणी अनेक वेळा वाढवल्या आहेत. त्यांनी केलेल्या वक्तव्यानंतर महाराष्ट्रात राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेसमध्ये सर्व काही सुरळीत चालले नसल्याच्याही चर्चा सुरू झाल्या होत्या.

महत्वाच्या बातम्या :-
“भीक मागेन पण लोकांचे पैसे देईन, मी एका दिवसात ४ लाखाचे ५४ लाख केलेला माणूस”
किरण माने मोदींना ‘फेकू’ आणि फडणवीसांना ‘हरामखोर’ म्हणाले? वाचा ‘त्या’ पोस्टमागील सत्य
महाराष्ट्राचा सहकारमंत्री स्वत: कपडे धूत होता; वाचा एन डी पाटलांच्या साधेपणाचा किस्सा

राजकारण

Join WhatsApp

Join Now