मोदींच्या मुत्सद्देगिरीची कमाल! आॅस्ट्रेलियने भारताच्या २९ पुरातन वस्तू व मुर्ती दिल्या परत

पंतप्रधान मोदी सरकारच्या काळात अनेक मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. याचबरोबर केंद्र सरकारकडून अनेक वेगवेगळ्या उपाय योजना आखण्यात येत असतात. तसेच भारत सरकारच्या पुढाकाराने आता ऑस्ट्रेलियातून (Australia) भारतात 29 प्राचीन मूर्ती आणल्या गेल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, 1976 पासून ते 2021 पर्यंत परदेशातून भारतात एकूण 54 दुर्मीळ आणि पुरातन वस्तू भारतात आणल्या गेल्या. त्यातील तब्बल 41 वस्तू या मोदी सरकारच्या काळात परेदशातून भारतात आणल्या गेल्या असल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.

आनंदाची बाब म्हणजे आता त्यात आणखी या मूर्तीची भर पडली आहे.  ऑस्ट्रेलियाने भगवान शिव, भगवान विष्णू आणि जैन परंपरेशी संबंधित 29 पुरातन वस्तू भारताला परत केल्या आहेत. तसेच ऑस्ट्रेलियामधून भारतात आणल्या गेलेल्या या मूर्ती अतिशय प्राचीन आणि दुर्मीळ असल्याची माहिती पीएमओ कार्यालयाच्या वतीने देण्यात आली आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, या पुरातन वस्तू ‘भगवान शंकर आणि त्यांचे शिष्य’, ‘शक्तीची उपासना’, ‘भगवान विष्णू आणि त्यांची रूपे’, जैन परंपरा, चित्रे आणि शोभेच्या वस्तू या सहा श्रेणीतील आहेत. या मूर्ती खडक, संगमरवर तसेच कास्य, पितळाच्या धातूपासून बनवण्यात आल्याची माहिती पंतप्रधान कार्यालयाच्या वतीने देण्यात आली आहे.

विशेष बाब म्हणजे, या मूर्तींमध्ये विविध देवी देवतांच्या मूर्तींचा समावेश आहे. ज्यामध्ये भगवान शंकर आणि त्यांचे शिष्य, जौन परंपरांशी संबंधित असलेल्या मूर्ती, प्राचीन काळात गृहसजावटीसाठी वापरण्यात येणाऱ्या मूर्ती आणि भारतातील विविध राज्यांच्या सांस्कृतीक वारश्याची जाणीव करून देणाऱ्या मूर्तींचा समावेश आहे.

दरम्यान, भारतात आणल्या गेलेल्या प्राचीन मूर्तींची पाहणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे.  भारतीय इतिहासाशी संबंधित हे पुरातत्व अवशेष तस्करांनी देशाबाहेर पाठवले होते. सरकारच्या हस्तक्षेपानंतर या प्राचीन कलाकृती भारतात परत आणण्यात आल्या आहेत. तसेच गेल्या वर्षी जुलैमध्ये ऑस्ट्रेलियाने या कलाकृती भारताला परत करण्याचा निर्णय घेतला होता.

महत्त्वाच्या बातम्या
नितेश राणेंच्या जिभेवरचा ताबा सुटला! AIMIM च्या प्रस्तावावरून अश्लील वक्तव्य, उडाली खळबळ
चीनचे विमान १३३ प्रवाशांसह डोंगराळ भागात कोसळले; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ आला समोर
राजस्थान हायकोर्टाने सलमानला दिला सर्वोच्च दिलासा, सलमानची बहिण अलवीराही मुंबईला परतली
पत्नीनं मटण बनवलं नाही म्हणून पतीनं केला थेट १०० नंबरला फोन, पुढे जे घडलं ते वाचून अवाक व्हाल