पंजाबमधील फिरोजपूर येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी एका सभेला संबोधित करण्यासाठी आले होते. पण आंदोलकांनी रास्ता रोको केल्याने पंतप्रधानांना त्यांचा कार्यक्रम रद्द करून पुन्हा दिल्लीला परतावे लागले.बुधवारी पंजाबमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी १५ ते २० मिनिटे एका उड्डाणपुलावर अडकून पडले होते. काही आंदोलकांनी रस्त्याने जात असताना पंतप्रधान मोदी यांचा रस्ता अडवला होता.
त्यानंतर पीएम मोदी सभेला न जाताच दिल्लीला परतले. भटिंडा विमानतळावर पोहचल्यानंतर तेथील अधिकाऱ्यांनी पंतप्रधान मोदींनी सांगितले की, “तुमच्या मुख्यमंत्र्यांचे आभार, मी भटिंडा विमानतळापर्यंत जिवंत परत येऊ शकलो.”या घटनेमुळे देशात खळबळ उडाली आहे.
केंद्रीय गृह मंत्रालयाने या घटनेला पंतप्रधानांच्या सुरक्षेतील गंभीर त्रुटी झाली, असे म्हंटले आहे. गृह मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ताफ्याने पंजाबच्या भेटीदरम्यान गंभीर सुरक्षा उल्लंघनानंतर परतण्याचा निर्णय घेतला. निवेदनात केंद्रीय गृह मंत्रालयाने पंजाब सरकारला या त्रुटीची जबाबदारी निश्चित करण्यास आणि कठोर कारवाई करण्यास सांगितले आहे.
पंतप्रधान भटिंडाहून हुसैनीवाला येथील राष्ट्रीय शहीद स्मारकाकडे जात असताना ही घटना घडली.पंतप्रधान नरेंद्र मोदी तब्बल दोन वर्षानंतर आज पंजाबमध्ये पोहोचले होते. वादग्रस्त कृषी कायदे रद्द झाल्यानंतर त्यांचा हा पहिलाच पंजाब राज्याचा दौरा होता. या कायद्यांबाबत पंजाबच्या शेतकऱ्यांनी दिल्लीच्या सीमेवर जवळपास वर्षभर आंदोलने केली होती. त्यामुळे या प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे.
पंतप्रधान ४२,७५० कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या विकास प्रकल्पांची पायाभरणी करणार होते, ज्यात फिरोजपूरमधील चंदिगड-स्थित पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च (PGIMER) चे उपग्रह केंद्र आणि दिल्ली-अमृतसर-कटरा एक्सप्रेसवे यांचा समावेश आहे. या कार्यक्रमानंतर पंप्रधान नरेंद्र मोदी एका सभेला संबोधित करणार होते.
महत्वाच्या बातम्या :-
‘मी हे आयुष्य जगले पण तू मला जिवंत केलंस’; सिंधूताईंच्या आठवणींनी भावूक झाली अभिनेत्री
स्टार प्रवाह वाहिनीवर लवकरच येणार नवी मालिका; ‘या’ हिंदी मालिकेचा आहे रिमेक
प्रभासच्या ‘राधेश्याम’ चित्रपटावर कोरोनाचे सावट; निर्मात्यांनी प्रदर्शनाबाबत घेतला मोठा निर्णय