Share

फडणवीसांनी आरेतील कारशेडबाबत निर्णय घेताच मनसेने केला विरोध, म्हणाले, नव्या सरकारने..

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर अखेर महाविकास आघाडीचे सरकार कोसळले आहे. शिंदेंनी भाजपसोबत हात मिळवणी करत सरकार स्थापन केले. गुरुवारी एकनाथ शिंदे हे राज्याचे नवे मुख्यमंत्री झाले, तर देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री झाले आहे. त्यानंतर त्यांनी लगेचच आपल्या कामाला सुरुवात केली आहे. (mns oppose devendra fadanvis decision on aare)

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आरेबाबत मोठा निर्णय घेतला आहे. आरेमध्येच मेट्रोचे कारशेड उभारण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. याला मुंबईकरांकडून विरोध होत आहे. तसेच शिवसेनाही याला विरोध करत आहे. असे असतानाच एक मोठी बातमी समोर आली आहे.

मेट्रोचं कारशेड आरेमध्ये उभारण्याच्या वादात आता मनसेने सुद्धा उडी घेतली आहे. मनसे नेते आणि राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांनी आरेमध्ये कारशेड उभारण्यास विरोध केला आहे. मनसेने आरेबाबात घेतलेली ही भूमिका सध्या चर्चेचा विषय ठरली आहे.

देवेंद्र फडणवीस यांचे सरकार असताना आरेतील कारशेडचे काम सुरु झाले होते. पण त्याला शिवसेनेने विरोध केला होता. तसेच महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर ते काम पूर्णपणे थांबवण्यात आलं होतं. पण आता पुन्हा एकदा भाजप सत्तेत आल्यानंतर फडणवीसांनी आरेतील कारशेडचे काम पुन्हा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. पण याला आता एक फेसबूक पोस्ट करत अमित ठाकरे यांनी विरोध केला आहे.

https://www.facebook.com/100044580872939/posts/pfbid0w26sYvAiEJbxVakFDQEM8aU6FqiQmg5dnMzmu1RwTYbZ4BvNgJLp9wuTL3Uu5y7fl/?d=n

फेसबूक पोस्ट-
मेट्रो कारशेड आरे जंगलातच करण्याचा नव्या सरकारने घेतलेला निर्णय माझ्यासारख्या असंख्य पर्यावरणप्रेमींसाठी धक्कादायक आहे. आरेमध्ये कारशेड होऊ नये म्हणून शेकडो तरुण तरुणींनी संघर्ष केला होता. काहींना तर पोलिसांनी गजाआड टाकलं होतं….

आपल्याला विकास हवाच आहे, पण पर्यावरणाचा बळी देऊन नको. आपलं पर्यावरण उद्ध्वस्त झालं तर भविष्यात राजकारण करायला माणूस नावाचा प्राणी शिल्लकच राहणार नाही, याचं ज्ञान सर्व राजकीय नेत्यांनी बाळगायला हवं. नवे मुख्यमंत्री आणि नवे उपमुख्यमंत्री यांनी आरेतील मेट्रो कारशेडबाबतच्या आपल्या निर्णयाचा पुनर्विचार करावा, ही आग्रहाची विनंती.

महत्वाच्या बातम्या-
चित्रपटसृष्टीवर शोककळा, प्रसिद्ध अभिनेत्याचा वयाच्या 30 व्या वर्षी ‘या’ भयानक आजाराने मृत्यु
पंतने एका झटक्यात मोडला धोनीचा 17 वर्षांपुर्वीचा रेकॉर्ड, 120 वर्षांनंतर पहिल्यांदाच झालं असं काही..
‘माझ्यावर रोज २० ते २५ जण बलात्कार करतात, अन् माझे आई वडील..; मुलीच्या गंभीर आरोपांनी खळबळ

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now