यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. त्यानंतर काल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सहकुटुंब मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी जाऊन गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं आहे. यामुळे आता एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांची जवळीक वाढत असल्याने विविध तर्कवितर्क लावले जात आहेत.
मनसे-भाजप आणि शिंदे गट यांच्यातील युतीबाबतच्या चर्चांना वेग आला आहे. गेल्या मुख्यमंत्री शिंदे गणेश उत्सवाच्या निमित्ताने नेत्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. मात्र या सगळ्या भेटीगाठींमध्ये मनसे प्रमुख राज ठाकरे यांची भेट लक्षणीय ठरली. आगामी काळात राजकीय समीकरण नेमकं कसं पाहायला मिळणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
अशातच केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी भाजप-मनसे युतीबाबत एक मोठं व्यक्तव्य केलं आहे. मंगळवारी पुणे श्रमिक पत्रकार संघाने संघाच्या सभागृहात आठवले यांच्याबरोबर वार्तालाप आयोजित केला होता. यावेळी बोलताना आठवले यांनी भाजप – मनसे युतीबाबत भाष्य केलं.
याबाबत बोलताना आठवले म्हणाले, ‘राज ठाकरेंच्या घरी कोणी जावे याला आमचा विरोध नाही. मात्र, राज यांनी आमच्या घरी यायला आमचा विरोध आहे. भाजपने राज ठाकरेंना सोबत घेतले, तर आम्ही कुठे जाणार नाही, तर इथेच बसून त्यांना बाहेर काढू,’ असा इशाराच आठवले यांनी दिला आहे.
दरम्यान, ‘मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकीसाठी मनसेची काहीही गरज नाही. भाजपने महायुतीत मनसेला घेऊ नये. तरीही महायुतीत मनसेला घेतल्यास आम्ही वेगळी भूमिका घेईल, असा इशारा आठवले यांनी दिला आहे. यामुळे आता भाजप – मनसे युतीबाबत भाजप काय भूमिका घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या