महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यांबाबत आक्रमक भूमिका घेतली आहे. तसेच जिथे जिथे अजान भोंग्यांवर वाजेल तिथे तिथे दुप्पट आवाजात हनुमान चालिसा लावा, असे आवाहन त्यांनी मनसैनिकांना केले होते. यामुळे राज्यातील वातावरण चांगलेच तापलेले आहे. (mns leader vasant more whatsapp status)
राज ठाकरेंनी गुढी पाडव्यानिमित्त एक सभा घेतली होती, त्यावेळी त्यांनी मशिदींवरील भोंग्यांविरुद्ध आक्रमक भूमिका घेतली होती. तेव्हपासून काही नेत्यांनी त्यांच्या भूमिकेला विरोध केला होता. अशात मनसे नेते वसंत मोरे हे देखील चर्चेत आले होते.
वसंत मोरे यांनी राज ठाकरेंच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर वसंत मोरेंसोबत घडलेल्या अनेक घटनांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. तसेच ते आता मनसे सोडणार का? असाही प्रश्न उपस्थित केला जात होता. त्यावर उत्तर देत आपण मनसेतच राहणार, असे वसंत मोरे यांनी स्पष्ट केले होते.
त्यानंतर राज ठाकरे पुण्याच्या दौऱ्यावर आले होते. तिथेही वसंत मोरे दिसून आले नाही. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले होते. पण आता वसंत मोरे यांचे स्टेटस व्हायरल झाले आहे. वसंत मोरे यांनी त्यांच्या स्टेटसमध्ये असे काही लिहिले आहे, की ज्यामुळे अनेकांचं लक्ष वेधलं गेलं आहे.
ज्यांच्या जीवनात संघर्ष नाही, निंदा नाही, विरोध नाही त्यांनी रस्ता बदला आपण चुकीच्या दिशेने आहोत आणि आजकाल याचे अनुभव येत आहे, असे स्टेटस वसंत मोरे यांनी त्यांच्या व्हॉट्सऍपला ठेवले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे.
वसंत मोरे यांनी यापूर्वी देखील मशिदींच्या भोंग्यांवर त्यांची भूमिका स्पष्ट केली होती. राज ठाकरेंच्या ठाण्यातील सभेत त्यांनी भाषण केलं होतं. पण राज ठाकरेंच्या पुणे दौऱ्यावर ते दिसून आले नव्हते. गेल्या दोन दिवसांपासून तिरुपती बालाजीचे दर्शन घेण्यासाठी ते बाहेर असल्याचे त्यांनी सांगितलं. पण मनसेच्या या आक्रमक भूमिकेत ते दिसत नसल्याचे अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे.
महत्वाच्या बातम्या-
तरुणाने थेट IAS अधिकाऱ्याच्या मुलीलाच पटवलं अन्…; लव्ह जिहादचे भयानक प्रकरण आले समोर
पंतप्रधान म्हणून कोण चांगलं असेल? शरद पवार की उद्धव ठाकरे? श्रीकांत शिंदेंनी दिले ‘हे’ उत्तर
मी तेव्हा १६ वर्षांचा होता, मला आठवत नाही; भीमा-कोरेगाव दंगल सुनावणीत शरद पवारांचं उत्तर