महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे भूमिका बदलाचे त्यांच्यावर आरोपही होत आहे. हिंदुत्वाच्या या भूमिकेत दिसून आल्यामुळे त्यांनी आता भूमिका बदलली अशी चर्चाही होत आहे. (mns leader shocking statement up people)
अशात मनसेच्या एका बड्या नेत्याने मोठे वक्तव्य केले आहे. मुंबईचा विकास हा भुमिपुत्रांमुळे झालाय आणि मेट्रो सिटी असल्यामुळे परप्रांतीयांचे सुद्धा यामध्ये योगदान आहे, असा दावा मनसेचे उपाध्यक्ष यशवंत किल्लेदार यांनी केला आहे.
जून महिन्यामध्ये राज ठाकरे अयोध्येच्या दौऱ्यावर जाणार आहे. पण राज ठाकरे यांनी अयोध्येला यायच्या आधी उत्तर भारतीयांची माफी मागावी. त्यानंतरच त्यांनी उत्तर प्रदेशात यावे, अशी अट भाजपचे खासदार ब्रीजभूषण सिंग यांनी घातली होती.
त्यानंतर आता ब्रीजभुषण सिंग यांच्या अटीला यशवंत किल्लेदार यांनी उत्तर दिले आहे. पण उत्तर देताना यशवंत किल्लेदार यांनी परप्रांतीयांचे कौतूक केले आहे. त्यामुळे चर्चांना चांगलेच उधाण आले आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि त्यांनी नेत्यांनी आतापर्यंत अनेकदा परप्रांतीयांच्या विरोधात भूमिका घेतली आहे. त्यामुळे मनसे नेत्याने परप्रांतीयांचे कौतूक केल्याने सगळीकडे हा चर्चेचा विषय ठरला आहे.
ब्रीजभुषण हे खुप भावनिक झालेले आहेत. त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्याचा मी आदर करतो. पण राज ठाकरे यांचा दौरा हा आधीच ठरला आहे. नियोजित वेळेप्रमाणे हा दौरा पार पडणार आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याबरोबर बोलून सर्व गोष्टी झाल्या आहेत. हा दौरा होणारच आहे, असे यशवंत किल्लेदार यांनी म्हटले आहे.
राज ठाकरेंच्या दौऱ्यासाठी लागणाऱ्या सर्व परवानग्या घेण्यात आल्या आहे. तसेच राज ठाकरेंनी उत्तर भारतीयांचा मेळावा घेऊन आपली भूमिका मांडली होती. त्यांची भूमिका ही उत्तर भारतीयांना पटलेली आहे, असे यशवंत किल्लेदार यांनी म्हटले आहे. तसेच त्यांचा हा गैरसमज भाजप नेते देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील हे दूर करतील, असेही किल्लेदार यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या-
धक्कादायक! मंदिरात लाऊडस्पीकरवरुन आरती केल्याने हत्या; वाचा नेमकं प्रकरण काय?
खान कुटुंबाची सून होणार होती महेश भट्ट यांची मुलगी, पण सलमान खान आडवा आला आणि…
मुस्लिम मुलीशी लग्न केल्याने हिंदू तरुणाची निर्घृण हत्या, संतापलेल्या भाजपने विरोधी पक्षांना विचारला ‘हा’ प्रश्न