राज्यात सध्या भोंग्यांच्या मुद्यावरुन वाद सुरु आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष यांनी औरंगाबादमध्ये, ठाण्यात आणि गुढीपाडव्यानिमित्त घेतलेल्या सभेत मशिदींवरील भोंग्यांवर आक्रमक भूमिका घेतली आहे. लवकरात लवकर हे भोंगे खाली उतरवा असे राज ठाकरेंनी म्हटले होते. (mns leader shehbaj panjabi join shivsena party)
गुढीपाडव्यानिमित्त पहिल्यांदा ते मशिदींवरील भोंग्यांवरून आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. त्यानंतर राज ठाकरेंच्या या भूमिकेवर अनेक मनसे नेत्यांनी नाराजी दाखवली होती. यामुळे तब्बल ३५ मनसैनिकांनी पक्षाच्या सदस्यत्व पदाचा राजीनामा दिला होता.
पुण्यातही पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले होते. सुरुवातीला मनसेच्या वाहतूक सेनेचे उपाध्यक्ष शेहबाज पंजाबी यांनी राजीनामा दिला होता. यानंतर पंजाबी आता शिवसेनेत प्रवेश करणार आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या उपस्थितीत ते शिवसेनेत प्रवेश करणार आहे.
मनसेला रामराम ठोकून ते आता शिवसेनेत प्रवेश घेणार आहे. तसेच मनसेला त्यांच्यासोबत रामराम ठोकलेले १० ते १२ जण त्यांच्यासोबत शिवसेनेत प्रवेश घेणार आहे. पंजाबी यांनी मनसे सोडल्यानंतर ते काही काळ वसंत मोरे यांच्यासोबत होते. पण राज ठाकरेंच्या भूमिकेमुळे त्यांनी वसंत मोरेंचीही साथ सोडली.
दरम्यान, वसंत मोरे यांनी राज ठाकरेंच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर वसंत मोरेंसोबत घडलेल्या अनेक घटनांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. तसेच ते आता मनसे सोडणार का? असाही प्रश्न उपस्थित केला जात होता. त्यावर उत्तर देत आपण मनसेतच राहणार, असे वसंत मोरे यांनी स्पष्ट केले होते.
अशात ज्यांच्या जीवनात संघर्ष नाही, निंदा नाही, विरोध नाही त्यांनी रस्ता बदला आपण चुकीच्या दिशेने आहोत आणि आजकाल याचे अनुभव येत आहे, असे स्टेटस वसंत मोरे यांनी त्यांच्या व्हॉट्सऍपला ठेवले आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चा सुरु झाल्या आहे.
महत्वाच्या बातम्या-
राम मंदिराच्या उभारणीची संपुर्ण टाईमलाईन, जाणून घ्या कधी पुर्ण होणार राम मंदिराचे काम?
एकाचवेळी ९ मुलांना जन्म देऊन एक वर्षापुर्वी महिलेने केला होता वर्ल्ड रेकॉर्ड, आता ती कुठं आहेत?
रविंद्र जडेजाला बाद केल्यानंतर हर्षल पटेलने केला जल्लोष, दोन वर्षांनंतर घेतला ‘असा’ बदला