महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी औरंगाबादमध्ये सभा घेतली आहे. गेल्या काही दिवसांपासून हिंदुत्वाचा मुद्दा राज्यभरात चर्चेत आहे. त्यामुळे ते औरंगाबादच्या सभेत काय बोलतील याकडे सर्वांचे लक्ष लागलेले होता. आता त्यांनी पुन्हा एकदा मशिदींवर निशाणा साधला आहे. ( mns leader raj thackray last warning)
रस्त्यावर येऊन तुम्ही नमाज पडता याचे अधिकार कोणी दिले तुम्हाला. आज तारीख १ आहे, उद्या २ आणि ३ तारखेला ईद आहे. त्यांच्या सणात मला मध्ये यायचं नाही. मात्र ४ तारखेपासून मी कोणाचं ऐकणार नाही, असा इशारा राज ठाकरेंनी राज्य सरकारला दिला आहे.
तसेच ४ तारखेनंतर जिथे जिथे अजान होणार तिथे तिथे दुप्पट आवाजात लाऊडस्पीकरवर हनुमान चालिसा लावू, प्रत्येक वेळेला आम्हीच का भोगायचं. आम्हाला सभा घ्यायची असल्यास शाळा आहे असे सांगतात. रात्रीची कुठे शाळा सुरु असते, असेही राज ठाकरेंनी म्हटले आहे.
उत्तर प्रदेशात लाऊडस्पीकर उतरवले जाऊ शकतात, तर महाराष्ट्रात लाऊडस्पीकर का उतरवले जाऊ शकत नाही? सर्व लाऊडस्पीकर अनधिकृत आहेत. सुप्रिम कोर्टानं सांगितलं आहे, स्थानिक पोलिस ठाण्याला माहिती दिल्याशिवाय तुम्ही लाऊडस्पीकर लावू शकत नाही. त्याची परवानगी घ्यावी लागते. किती मशिदींकडे परवानगी आहे? असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला आहे.
तसेच इथे संभाजीनगरमध्ये ६०० मशिदी आहेत. हे संपूर्ण देशात असून देशभरातील लाऊडस्पीकर खाली आले पाहिजे, असे राज ठाकरेंनी म्हटले आहे. तसेच लाऊडस्पीकर हा सामाजिक विषय आहे. धार्मिक नाही, जर तुम्ही याला धर्माचं नाव देत असाल तर त्याचं उत्तर धर्मानेच देऊ, असेही राज ठाकरे यांनी म्हटले आहे.
मला कुठेही महाराष्ट्रात दंगली घडवायच्या नाहीत. तशी माझी इच्छा देखील नाहीये. मुस्लीम समाजाने देखील ही गोष्ट समजून घेणं गरजेचं आहे. आमची इच्छा नसताना आम्हाला टोकाची भूमिका घ्यायला लावू नका. महाराष्ट्रातील शांतता आम्हाला भंग करायची नाहीये, असेही राज ठाकरे यांनी म्हटले आहे.
अशात राज ठाकरेंचे भाषण सुरू असतानाच अजान सुरू झाली होती. त्यावेळी राज ठाकरे आणखीच संतापले. ते म्हणाले, पोलिसांना विनंती आहे की, हे जर माझ्या सभेवेळी बांग सुरू करणार असतील तर यांच्या तोंडात बोळा कोंबा. तसेच ४ तारखेपासून हे ऐकणार नसतील तर एकदाच होऊन जाऊदे, असेही राज ठाकरे म्हणाले आहे.
महत्वाच्या बातम्या-
शरद पवारांना हिंदू शब्दाचीच ॲलर्जी – राज ठाकरेंचा घणाघात
यांच्या तोंडात बोळा कोंबा, यांना सरळ शब्दांत सांगून कळत नसेल तर…; सभेस्थानी अजान होताच राज संतापले
“बाळासाहेब ठाकरे भोळे होते, भाजपने वेळोवेळी त्यांना फसवले आहे, हे मी डोळ्यांनी पाहिलंय- उद्धव ठाकरे