राज्यात सध्या मशिदींवरील भोंग्यांवरुन वाद सुरु आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भोंग्यांबाबत आक्रमक भूमिका घेतलेली आहे. त्यामुळे संपूर्ण राज्याचे वातावरण तापलेले आहे. अशात भोंगा नावाचा एक मराठी चित्रपट प्रदर्शित झाला आहे. (mns leader on bhonga film)
भोंगा हा सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला असून हा सिनेम सध्याच्या परिस्थितीवर भाष्य करणारा असल्यामुळे चांगलाच चर्चेत आहे. राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त हा चित्रपट प्रदर्शनापूर्वीच चर्चेत आला होता. पण हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर राज्यात आणखी तणाव वाढेल, असे म्हटले जात आहे.
आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमेय खोपकर यांनी ट्विट करत राज्य सरकारसमोर एक प्रश्न उपस्थित केला आहे. राज्य सरकार हुकूमशहासारखं वागतंय. ‘भोंगा’ चित्रपट थिएटरमधून काढायला लावतायत. पोलिसांना बेकायदेशीर कामं करायला स्वतः गृहखातंच सांगतंय, असे ट्विट अमेय खोपकर यांनी केले आहे.
https://twitter.com/MNSAmeyaKhopkar/status/1521468919516704770?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1521468919516704770%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fmarathi.abplive.com%2Fentertainment%2Fbollywood%2Fameya-khopkar-and-amol-kagne-raise-their-voice-after-maharashtra-police-compels-theatres-to-stop-screening-bhonga-1055917
तसेच जो सिनेमा राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित आहे. त्याला सेन्सॉर बोर्डाचं प्रमाणपत्र मिळालेलं आहे. तो सिनेमा चित्रपटगृहातून काढायला लावणं हे पोलिसांच्या कोणत्या अधिकारात बसतं? असाही सवाल अमेय खोपकर यांनी यावेळी उपस्थित केला आहे.
जो चित्रपट राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित आहे, सेन्सॉर बोर्डाचं प्रमाणपत्र मिळालेलं आहे, तो ‘भोंगा’ चित्रपट थिएटरमधून काढायला लावणं, हे पोलिसांच्या कोणत्या अधिकारात बसतं?
— Ameya Khopkar (@MNSAmeyaKhopkar) May 3, 2022
दरम्यान, भोंगा हा धार्मिक विषय नाहीये, तर हा विषय सामाजिक आहे, असे या चित्रपटातून म्हटले आहे. भोंगा हा सिनेमा ३ मे रोजी प्रदर्शित झाला आहे. भोंगा हा चित्रपट राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक शिवाजी लोटन पाटील यांनी दिग्दर्शित केला आहे.
अजानच्या भोंग्यांमुळे होणारा त्रास या चित्रपटात दाखवण्यात आला आहे. या चित्रपटात भोंग्याच्या आवाजामुळे एका लहान बाळाला झोप येत नाही, त्यामुळे त्याला एक आजार होतो, असे या चित्रपटात दाखवण्यात आलेले आहे. तसेच त्या भोंग्याला बंद करण्यासाठी गावकरी काय काय प्रयत्न करतात हेही या चित्रपटात दाखवण्यात आले आहे.
महत्वाच्या बातम्या-
भारती सिंहने पुन्हा दिली खुशखबर; म्हणाली, मी एकटी नाही तर हर्षही याला जबाबदार आहे…
उर्वशी रौतेलाच्या शॉर्ट स्कर्टने दिला धोका, झाली ऊप्स मोमेंटची शिकार, पहा व्हिडीओ
वॉर लव्ह स्टोरी: रशियन स्फोटामुळे दोन्ही पाय गमवावे लागले, प्रियकराने हॉस्पिटलमध्येच केले लग्न…